फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. रिल्स, जुगाड, स्टंट तसेच भांडणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही रेल्वे संबधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, लोक आपला वेळ वाचवा म्हणून चित्र-विचित्र जुगाड सोधत असतात. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. मात्र, यामध्ये रेल्वे प्रवाशांनी वेगळाच मार्ग काढला आहे. यामुळे त्यांच्या जीव धोक्यात येण्याची देखील शक्यता आहे. गेल्या वर्षभरात अशा स्टंटमुळे अनेकांचा रेल्वे अपघातात जीव गेला आहे. मात्र, तरीही लोक वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
व्हिडिओत नेमके काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकती की, एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी आहे. ट्रेनमधून प्रवासी उतरत आहेत, पण ते अशा ठिकाणावरुन उतरत आहे की यामुळे जर का ट्रेन अचानक सुरू झाली तर त्यांचा जीव जाण्याची शक्यता आहे. प्रवासी लोखंडाची जाळी असलेल्या भागांतून प्रवेश नसलेल्या ठिकाणावरुन प्लॅटफॉर्म ओलांडताना दिसत आहेत. प्रवाशांनी जीवाची काळजी न बाळगता हा धोकादायक प्रयत्न केला आहे. हे किती धोकादायक आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा असल्याते सांगण्यात आले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
A post shared by Borivali Churchgate Bhajan (@borivali_churchgate_bhajan)
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @borivali_churchgate_bhajan या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवरील प्रतिक्रीयांलरुन हा व्हिडिओ दादर स्टेशनच्या आतला असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी लोकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने म्हटले आहे की, हे रोजचे झाले आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, लोकांना त्यांच्या जीवाची थोडीपण काळजी नाही. आणखी एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना त्यांचा जीव गेल्याशिवाय समजत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.