viral video young girl performs horrible stunt on road video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हि़डिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच कधी कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसावे का रडावे कळत नाही. स्टंट, जुगाड, भांडण, यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करुन तरुणांमध्ये याचे जास्त वेड आहे. सध्या असाच एक स्टंटबाजीचा हैराण करवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीने भर रस्त्यात धोकायादक स्टंट केला आहे. यामुळे नेटकरी हैराण झाले आहे. तसेच हे तिने केवळ एक रिल बनवण्यासाठी केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणीने रस्त्यावर पेट्रोल वर्तुळात ओतले आहे. त्यानंतर त्याला पेटवले आहे आणि त्याच्या मध्ये उभे राहून वेड्यासारखे डान्स करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु आहे. अशातच एखाद्या गाडीने पेट घेतला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तिचे हे कृत्य सुरु असताना रस्त्यावरुन येणारे जाणारे लोक स्तब्ध होऊन पाहत आहेत. परंतु तरुणीला कोणताही फरक पडत नाही. तरुणाचा तमाशा सुरूच आहे. हा व्हिडिओ तिथूनच जाणाऱ्या एका स्कूटर चालकाने रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ परदेशातील असल्याचे व्हिडिओतील दृश्यांमधून लक्षात येते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
迷惑すぎるだろ
何してんのこの人?
— 世界のトレンド報道局🕊️ (@twisokhou) June 8, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @twisokhou या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने काय वेडेपणा आहे हा, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने हिला ऑस्कर दिला पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियालर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंटचे प्रमाण वाढले आहे. अनेकडण स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.