बायडेन 2.0! एअर फोर्स वनच्या पायऱ्या चढताना ट्रम्प यांचा तोल गेला अन्...; नेटकऱ्यांनी केले ट्रोल, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये सामान्यांपासून ते सेलिब्रिटी, प्रभावशाली नेते सर्वांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्या ना कोणत्या विषयवारुन चर्चेत असतात. सध्या ते टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी वादावरुन जोरदार चर्चेत आहेत. तसेच त्यांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.सध्या त्यांच्या आणखा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एअर फोर्स वन विमानामध्ये पायऱ्या चढताना त्यांचा तोल गेला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन २.० म्हणून खिल्ली उडवली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो दोघेही एअर फोर्स वनमध्ये चढताना अडथले होते. परंतु केवळ डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रोल केले जात आहे.
खरं तरं निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा जो बायडेन यांना ट्रोल केले होते. त्यांनी अनेकदा बायडेन यांची पब्लिक प्लेसमध्ये अडथल्यामुळे खिल्ली उडवली होती. परंतु आता ट्रम्प यांचा तोल गेला असून त्यांचीही खिल्ली उडवली जात आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
🚨 BREAKING: DOWN GOES DONALD
Trump just stumbled and almost faceplanted boarding Air Force One. I’ve been telling you — he drags his legs and he’s clearly not well.
When Biden stumbled, the media lost its mind and Tapper wrote an entire fake “nonfiction” book.
Where are they… pic.twitter.com/MZlHfbfDUJ
— Chris D. Jackson (@ChrisDJackson) June 8, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ChrisDJackson या अकाउंटवर शेअक केला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज आले आहेत. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. अनेकांनी ट्रम्प यांना ट्रोल केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, बायडेनसोबत ही घटना घडली होती त्यावेळी याची खूप चर्चा झाली, ट्रम्प यांनी त्यांचे हसू देखील उडवले. आता ट्रम्प यांची नाही का?, तर दुसऱ्या एका युजरने बायडेन २.० असे म्हटले आहे. तर आणखी एकाने, त्यांचे वय झाले आहे असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.