पोपट रॉक, युजर्स शॉक! हेल्मेट घातलं, सायकलवर बसला अन् पेडल मारत संपूर्ण घरभर फिरला... पाहून सर्वच झाले चकित; Video Viral
अनेकदा आपल्याला वाटतं त्याहून कित्येक पटींनी प्राणी आणि पक्षी जास्त हुशार निघतात. पोपट हा सर्व पक्ष्यांमध्ये बुद्धिमान पक्षी मानला जातो. त्याच्या गोंडस रुपाने आणि मधुर आवाजाने तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. काही पोपट तर असेही असतात जे हुबेहुब माणसाच्या आवाजाची नक्कल करु शकतात. तुम्ही कधी ना कधी असे पोपट पाहिले असतील पण हेल्मेट घालून सायकल चालवणारा पोपट तुम्ही कधी पाहिला आहे का? या निरळ्या पोपटाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. यातील पोपटाची कमाल पाहून लोक चांगलेच चकीत झाले असून वेगाने इंटरनेटवर या व्हिडिओला शेअर केले जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
25 लाख दगड फोडून कसं उभारलं कैलास मंदिर? 1200 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं? अद्भुत AI Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोपटाच्या स्वारीची एक प्रतिभा दिसेल. घडतं असं की, मालकाने पोपटासाठी एक लहान त्याला चालवता येईल अशी सायकल खरेदी केलेली असते. तो पोपटाला यावर बसवून त्याला हेल्मेट घालतो, ज्यानंतर पोपटही उत्साहात येतो आणि पॅडल मारत घरभर सायकल फिरवू लागतो. पोपटाला असे सायकल चालवताना पाहून आता यूजर्स चांगलेच खुश झाले आहेत. हेल्मेट घालताच खुलून आलेलं त्याच सुंदर साैंदर्य सर्वांनाच मोहित करत आहे, ज्यामुळे लोक ही दृश्ये शेअर देखील करत आहेत. सायकल चालवणाऱ्या पोपटाच्या या व्हिडिओला ७,५०,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर अनेकांनी यावर भरभरुन कमेंट्स देखील केल्या आहेत.
हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral
पोपटाचा हा व्हिडिओ @kennyslowbird नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप गोड” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी माझ्या पोपटाकडे पाहिले आणि ती म्हणाली की तो एआय आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला शेवटपर्यंत हे खरं वाटत होतं पण नाही हे एआय आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.