
भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या विदाईच्या या व्हिडिओमध्ये, आपल्याला मंडप दिसतो. व्हिडिओत दोन बायका वधूला आपल्या हाताने उचलत बाहेर नेत असतात. तर वधू मात्र यावेळी हंबरडा फोडून रडत असते. व्हिडिओत महिलांच्या मागून आपल्याला इतर वऱ्हाडी मंडळी देखील बाहेर येत असल्याचे दिसून येते. व्हिडिओतील ही दृश्ये पाहून सोशल मिडिया यूजर्स मात्र आता अवाक् झाले आहेत. काहींनी हे नक्की काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे तर काहींनी ही विदाई नसून विसर्जन सोहळा सुरु असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओ नक्की कुठला आहे याची कोणतीही माहिती मिळाली नसली तरी सोशल मिडियावर या व्हिडिओला खूप जास्त पसंत केलं जात आहे. विदाईचा अनोखा पॅटर्न पाहून लोकांना हसू फुटलं ज्यामुेळे व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअरही करण्यात आलं.
हा व्हिडिओ @knowledgemedia07 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वर आहे की पळून गेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असं वाटत आहे की तिला जबरदस्ती पाठवलं जात आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रश्न असा आहे की मुलगी इतकी का रडत आहे, तिच्या संमतीशिवाय लग्न झालं आहे का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.