आई-बाबा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात? चिमुकलीचे भन्नाट उत्तर म्हणाली..., तुम्हीच ऐका
सोशल मीडियावर आपल्याला रोज भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, ते पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर हसू आवरता येत नाही. लहान मूलांचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी डान्सचे तर कधी त्यांच्या वेगळ्या बोलण्याचे व्हिडिओ आपण पाहतो. ही लहान मुले कधी कधी असे काही बोलून जातात की पोट धरून हसायला येते.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये चिमुकली नवरात्रीच्या कार्यक्रमात तिला विचारलेल्या प्रश्नाचे असे उत्तर देते की, तेथील सर्वजण खळखळून हसू लागतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी अनेक लोक जमलेले आहेत. तिथेच एक ॲंकर एका चिमुकलीला प्रश्न विचारत आहे. ती तिला विचारते की, तुझ्या आईचे नाव काय? यावर ती चिमुकली सांगते की, राजश्री नंतर बाबांचे नाव विचारते तर चिमुकली सांगते की, गौरव. मग ॲंकर विचारते की, तुझे मम्मी-पप्पा एकमेकांना प्रेमाने काय म्हणतात? त्यावर चिमुकली म्हणते की मालू आणि बोक्या. चिमुकलीचे हे उत्तर ऐकून सर्वजण हसायला लागतात. नंतर पुन्हा एकदा ॲंकर विचारते की, मालूआणि बोक्या काय विषय आहे तर या प्रश्नावर चिमुकली म्हणते की, चूक-भूल माफ करावी. तिचे असे उत्तर ऐकून ॲंकर हसत हसत खाली बसते. तसेच तेथील अनेक लोक खळखळून हसू लागतात.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ॲंकर अक्षता कान्हरकरने शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहिल्यावर खळखळून हसले आहेत. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, यामुळे घरात नवरा-बायको जसे वागतात तसेच मुले शिकतात यामुळे घरात नम्र बोलायला शिका, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मुले ही देवाघरची फुले आहेत ती कधीही खोटं बोलत नाहीत, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, आई-बाबा कोमात, चिमुकली जोमात अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत.