फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही तर अनेकदा आश्चर्याचा धक्का बसणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी भांडणाचे तर कधी जुगाडाचे, कधी डान्स रील्स तर कधी स्टंट व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या एख असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही.
तुम्ही सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. प्राणी देखील माणसांप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्टर्य वाटते. कधी सापाने स्वत:ला गिळण्याचा प्रयत्न केल्याचा, तर कधी प्राण्यांच्या भांडणाचा. तर कधी त्यांचा गोंडस असा व्हिडिओ आपण पाहतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ तर खूप मजेशीर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
म्हशीलाही आवरला नाही शिकण्याचा मोह
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात अचानक एक म्हैस शिरते. तिला बघून काही विद्यार्थी घाबरून बाजूला होतात. तर काही विद्यार्थी तिची व्हिडिओ काढायला लागतात. ती म्हैस इकडे-तिकडे बघत असते. तीच्या मागे एक माणूस येतो. आणि तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा ती बाहेर जात नाही. मग तो माणूस तीला ओढत बाहेर घेभन जातो. बाहेर कॉरिडोअरमध्ये देखील काही विद्यार्थी असतात जे घाबरून बाजुला होतात.
हे देखील वाचा- बाईईईईईईईई हा काय प्रकार? महिलांचा ‘असा’ डान्स पाहून लोक हसूनहसून लोटपोट म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर doaba_x08 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, तिच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी आली असेल बहुतेक, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, प्रवेश मिळाला का भाऊ?, आणखी एका युजरने म्हटले आहे की, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे हे तिला कळाले असेल बहुतेक. तर अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.