सापाने चावताच तरुणाने केलं असं... पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल, Video Viral
दररोज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांना आश्चर्यचकित करत असतात कारण तेथे दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतात कारण व्हिडिओमध्ये असे काही दिसत आहे जे व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीला कधीच अपेक्षित नसेल. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही आतापर्यंत असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील.
सोशल मीडियावर सापाने अनेक थरारक व्हिडिओज व्हायरल होत असतात. साप हा मुळातच एक धोकादायक प्राणी आहे. त्याचा दंश फार प्राणघातक ठरत असतो. तो त्याच्या एकाच दंशाने समोरच्या व्यक्तीला मृत्यूच्या दारी पोहचवतो. याच कारणास्तव प्राणीच काय तर माणसंही त्याच्या वाटेला जात नाहीत आणि त्याला पाहताच आपली वाट बदलतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काहीतरी भलतच घडलेलं दिसून आलं आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा – मुंगूस आणि कुत्र्यांमध्ये झाले युद्ध, कोण कोणावर पडले भारी? थरारक लढतीचा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीच्या हातात साप दिसत आहे जो तुम्हाला सहसा कुठेही दिसणार नाही. तो साप अचानक व्यक्तीवर हल्ला करतो आणि त्याचा चावा घेतो. यानंतर, व्यक्ती कॅमेरामध्ये पाहत काही वेळ थांबतो आणि नंतर अचानक तो सापाला पकडतो आणि त्याला जोरात चावतो. ही अनपेक्षित घटना पाहून अनेकांना धक्का बसतो. यानंतर काही वेळातच साप त्याला सोडून निघून जातो. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून व्यक्तीच्या या कृत्याला पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. दरम्यान सापाला चावणे अत्यंत धोकादायक ठरू शकते यांच्यातील विष आपल्याला क्षणार्धात मृत्यूच्या दारी पोहचवू शकते. सापाला चावल्याने व्यक्तीचे पुढे काय घडले याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
हेदेखील वाचा – एक चूक अन् थेट मृत्यूचे दार! बिहारमधील रेल्वे कर्मचाऱ्याचा बोगी आणि इंजिनमध्ये चिरडून मृत्यू, धक्कादायक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @cutecomrade नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युआजरने लिहिले आहे, “शेवटी कोणीतरी संपूर्ण मानवजातीकडून सूड घेतला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सापाला न्याय मिळाला हवा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “न्यूटनचा तिसरा नियम – प्रत्येक क्रियेची समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. यामुळे हे सिद्ध झाले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.