Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे… स्पेनमध्ये आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral

White Iberian lynx : नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्पेनमधील एका छायाचित्रकाराने त्याचे सुंदर दृश्ये आपल्या कॅमेरात टिपले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2025 | 12:14 PM
पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे... स्पेनमध्ये आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral

पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे... स्पेनमध्ये आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पांढऱ्या इबेरियन लिंक्सचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे
  • ही प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर होती
  • प्राण्याचे सुंदर रूप युजर्सना भुरळ घालत आहे

सोशल मिडियाद्वारे अनेक नवीन घटना आपल्या नजरेसमोर येत असतात आणि अशाच एका घटनेने आता इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे. स्पेनमध्ये जाएन या डोंगराळ प्रदेशात एक अनोखा आणि सुंदर प्राणी आढळून आला आहे. सहसा ही जंगली मांजरीसारखी प्रजाती सोनेरी किंवा तपकिरी रंगाची असते, परंतू यात हा मांजरीप्रमाणे दिसणारा हा प्राणी संपूर्णपणे पांढऱ्या रंगाचा आहे. त्याच्या या अनोख्या आणि दुर्मिळ साैंदर्याने आता सर्वांना भूरळ घातली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चला याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की… पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral

या दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ स्पॅनिश वाईल्डलाईफ फोटोग्राफर अँजेल हिडाल्गो याने आपल्या कॅमेरात टिपला आहे. तो म्हणाला, “मी वर्षानुवर्षे कॅमेरे लावत आहे, अनेक प्रयत्न अयशस्वी झाले, परंतु यावेळी निसर्गाने मला असे काही दिले जे मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.” या प्राण्याला इबेरियन लिंक्स असे म्हटले जात असून त्याचे पांढरे रुप फार दुर्मिळ आहे. या लिंक्सला ल्युसिझम नावाचा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे, ज्यामुळे त्याची त्वचा फिकट रंगाची होते. तथापि, अल्बिनो प्राण्यांपेक्षा वेगळे, त्याचे डोळे आणि शरीर पूर्णपणे सामान्य आहे. याचा अर्थ असा की पांढरा असूनही, तो पूर्णपणे निरोगी आहे. हा प्राणी इतका दुर्मिळ आहे की तो एखाद्या परीकथेतील जादुई प्राण्यासारखा तो वाटत आहे. जगातील दुर्मिळ वन्य मांजरींपैकी एक असलेली ही प्रजाती दोन दशकांपूर्वी नामशेष होण्याच्या मार्गावर होती, जेव्हा तिची संख्या १०० पेक्षा कमी झाली होती. अशात व्हायरल झालेल्या त्याच्या दृश्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

A photographer in southern Spain captured what is believed to be the first-ever white Iberian lynx, a leucistic big cat so rare it seems almost mythical. Already one of the world’s rarest cats, the Iberian lynx was pulled back from the brink of extinction after its population… pic.twitter.com/rLQrMfbCNq — Breaking911 (@Breaking911) October 29, 2025

हे दश्य हा व्हायरल व्हिडिओ @Breaking911 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सर्व माहिती देण्यात आली असून यात लिहिले आहे की, ‘दक्षिण स्पेनमधील एका छायाचित्रकाराने पहिल्यांदाच आढळणारा पांढरा इबेरियन लिंक्स, एक ल्युसिस्टिक मोठी मांजर, जो दुर्मिळ आहे आणि जवळजवळ काल्पनिक वाटतो, त्याचे छायाचित्रण केले. जगातील दुर्मिळ मांजरींपैकी एक असलेल्या इबेरियन लिंक्सची लोकसंख्या दोन दशकांपूर्वी १०० पेक्षा कमी झाल्यानंतर तिला नामशेष होण्याच्या मार्गावरून मागे घेण्यात आले’.

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral

व्हिडिओला आतापर्यंत 46 मिलियनहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून लाखो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काल्पनिक की फक्त उत्क्रांती?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एका 3D अ‍ॅनिमेटेड पात्रासारखा दिसतो पण मला त्याचे कारण समजावून सांगता येत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते खरे आहे की एआय आहे हे मला कळत नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: White iberian lynx spotted in spain photographer capture view in camera video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • animal
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की… पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral
1

कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की… पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral
2

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral

बाईईई हा काय प्रकार? म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर… पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral
3

बाईईई हा काय प्रकार? म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर… पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral

किसी का खौफ ही बचा नहीं! दारूच्या नशेत मद्यपीने वाघाला समजले मांजर, जंगलाच्या शिकाऱ्यालाच पाजू लागला दारू; Video Viral
4

किसी का खौफ ही बचा नहीं! दारूच्या नशेत मद्यपीने वाघाला समजले मांजर, जंगलाच्या शिकाऱ्यालाच पाजू लागला दारू; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.