या किड्याचे नाव ' 'Donald Trump' का आहे? वैज्ञानिकांचे कारण ऐकून पोट धरून हसाल
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला 47 वे राष्ट्राध्यक्ष मिळणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली बाजी मारली आहे. 2017 च्या राष्ट्रपतीपदाची निवडणूकही त्यांनी लढवली आणि जिंकली. त्यामुळे आता डोनाल्ड दुसऱ्यांना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. सर्वत्र सध्या त्यांच्या या विजयाचीच चर्चा होत आहे. दरम्यान आम्ही तुम्हाला सांगतो, 2017’च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पने जेव्हा निवडणूक जिंकली त्याच वर्षी, कॅलिफोर्नियामध्ये एक नवीन कीटकाची ओळख झाली . शास्त्रज्ञांनी या कीटकाचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ असे ठेवले आहे. त्याचे नाव होते, निओपालपा डोनाल्डट्रम्पी (Neopalpa DonaldTrumpy) असे आहे. शास्त्रद्यांनी हे नाव ठेवण्यामागे एक अनोखे कारण दडलेले आहे, हे कारण आज आपण जाणून घेणार आहोत.
कीटकाचे नाव ट्रम्प का ठेवले?
कॅनेडियन संशोधक वॅझरिक नाझारी (Vazrik Nazari) यांनी कॅलिफोर्नियामध्ये निओपालपा डोनाल्डट्रम्पी कीटकाचा शोध लावला. डिस्कव्हर वाइल्डलाइफच्या (Discover Wildlife) अहवालानुसार, हा पतंग ओळखून त्याचा अभ्यास करणारे वैझारिक नाझारी यांनी ट्रम्प यांच्या नावावर याचे कारण सांगताना सांगितले की, “पतंगाच्या कपाळावरील तुकड्याचे विचित्र समानता त्याच्या नावाची प्रेरणा बनली.”
बीबीसीच्या (BBC) वृत्तानुसार, या कीटकाच्या डोक्यावर खास स्टाईलमध्ये असलेले सोनेरी गुच्छ शास्त्रज्ञांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेयरस्टाईलप्रमाणे दिसत होते. त्याच्या केसांमुळे विरोधक त्यांना वारंवार ट्रोल करत होते.
हेदेखील वाचा – सापाशी जीवघेणा खेळ व्यक्तीला पडला महागात, थेट जिभेवर घेतला चावा, Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप
अशा अनेक प्रजाती नष्ट होणे बाकी आहे: वझेरिक नाझरी
वैजारिक नाझरी म्हणाले, “मला लोकांचे लक्ष या वस्तुस्थितीकडे आणायचे होते की अमेरिकेत अशा अनेक प्रजाती आहेत ज्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचे जतन करणे महत्वाचे आहे. ”
संशोधकांच्या मते, पतंगाच्या आसपास पसरलेल्या प्रसिद्धीमुळे संवर्धनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल. “युनायटेड स्टेट्सच्या 45 व्या राष्ट्राध्यक्षांच्या नावावर या प्रजातीचे नाव देऊन, मला आशा आहे की उत्तर अमेरिकन जैवविविधतेच्या या दुर्लक्षित सूक्ष्मजीव घटकाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अल्फा-टॅक्सोनॉमीच्या महत्त्वकडे काही लक्ष आणि स्वारस्य आणले जाईल,” असे नाझरी म्हणाले.
हेदेखील वाचा – वाघाच्या तोंडात हाथ घालून तरुण करत होता स्टंटबाजी तितक्यात वाघाने केलं असं…आयुष्यभराची घडली अद्दल, Video Viral
निओपालपा डोनाल्डट्रम्पी (Neopalpa donaldtrumpi) बद्दल सध्या फारच कमी माहिती आहे, ते कोणत्या भागात आढळते या व्यतिरिक्त याबाबत कोणतीही अधिक माहिती उपलब्ध नाही. कीटकांची ही प्रजाती दक्षिण कॅलिफोर्नियाच्या कोरड्या वाळवंटात आणि मेक्सिकन प्रदेश बाजा कॅलिफोर्नियामध्ये अधिकतर आढळून येते.