Wife beat husband with slippers after he gave her triple talaq VIDEO VIRAL
Husband and Wife Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अलीकडे कोणीही कधीही कुठेही भांडायला सुरुवात करतात. आसपासच्या परिस्थितीचे भानही लोकंना राहत नाही. यामध्ये अनेकदा पत्नी-पत्नीच्या भांडणाचे देखील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पत्नी आपल्या नवऱ्याला चप्पलांनी मारताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तरप्रदेशच्या रामपूर मध्ये घडली असून एका नवऱ्याने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला होता. यामुळे पत्नी त्याला मारहाण करत असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला एका पुरुषाला चप्पलांनी मारत आहे. तिने त्याचा शर्टही फाडला आहे. तसेच त्याची कॉलर पकडून त्याच्या कानशिलात देखील वाजवल्या आहे. आसपासचे लोक तिला थांबण्याता प्रयत्न करत आहेत. पण महिला कोणचेही ऐकत नाही. आपल्या पतीला मारत राहते. हा सर्व प्रकार कोर्टाबाहेरच घडला असल्याचे व्हिडिओच्याा कॅप्शनमध्ये देण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिवर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल व्हिडिओ
In Rampur, outside the court, a wife beat her husband with slippers—five strikes in five second: chased him, grabbed him by the collar, and tore his clothes after he gave her triple talaq.
pic.twitter.com/i62tcLClGJ— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 14, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, म्हणून त्याने तलाक दिला असणार. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तलाक दिल्यानंतरही बिचाऱ्याची कटकट गेली नाही. तर काही लोकांनी महिलेला समर्थन करत अशा लोकांना असाच मार दिला पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठी धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.