क्या गुंडा बनेगा रे तू! बाईक घेऊन तरुणाला लुटायला गेले अन् पलटला खेळ...; जे घडलं पाहून हसून लोटपोट व्हाल, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडिया अलीकडे मनोरंजनाचे एक उत्तम माध्यम बनले आहे. यावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन पठ्ठे एका तरुणाला लुटायला गेले होते, पण त्यानंतर त्यांच्यासोबत जे घडलं आहे ज्याची त्यांनी कल्पना देखील केली नसले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण गाडीला टेकून मोबाईन फोन बघत उभा राहिला आहे. यावेळी अचानक दुसऱ्या बाजूने दोन तरुण बाईकवरुन त्याच्याजवळ येतात. दोन्ही तरुणांनी रुमालाने आपले तोंड अर्धवट बांधलेले आहे, ज्यामुळे कोणाला त्यांची ओळख कळू नये. दोन्ही तरुण रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तरुणाजवळ येतात. बाईकवरुन उतरुन त्याला चाकू दाखवतात.
त्याच्या कानाखाली दोन तीन वेळा मारतात आणि त्याला त्याच्याकडील मौल्यवान वस्तू देण्यास सांगतात. त्याच्या मोबाईल काढून घेतात. तरुणही शांतपणे खिशातून आणि हातातून पाकीट आणि घड्याळ काढू देतो. याच वेळी दुसऱ्या खिशातून तरुण अचानक एक बंदूक काढतो. यामुळे त्याला लुटायला आलेल्या तरुणांती घाबरगुंडी उडते. यानंतर बंदुक असलेला त्या तरुणांना लुटतो आणि त्यांना मारु लागतो. आपले सामान घेतो. यानंतर बाईकवरील दोन्ही तरुण तिथून निघून जातात.
‘माझ्या पाठीत दुखतंय…’; कर्मचाऱ्याचा मेसेज अन् केवळ 10 मिनिटात झाला मृत्यू, मॅनेजरलाही बसला धक्का
व्हायरल व्हिडिओ
When you choose the wrong guy 🤭👌 pic.twitter.com/vLIW40PYri
— RVCJ Media (@RVCJ_FB) September 15, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RVCJ_FB या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, लेने के देणे पड गये, तर दुसऱ्या एकाने त्यांनी लुटण्यासाठी चुकीच्या माणसाला निवडले, तर तिसऱ्या एकाने जेव्हा हॅकर डेव्हलपरला भेटतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा आहे. पण ही घटना नेमकी कुठे घडली याची माहिती मिळालेली नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.