Without helmet, on triple seat and violating rules Young men and women doing obscene acts on the road, video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून धक्का बसतो. तर अनेकदा संतापजनक असे व्हिडिओ पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे अनेक लोकांचे दुर्दैवी अपघात झाले आहेत. मात्र यातून सबक घेण्याऐवजी लोक तसेच पुन्हा पुन्हा वागतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
यामध्ये एक तरुण आणि तरुणी दुचाकी चालवताना नियम मोडताना दिसत आहे. यामध्ये तरुणांनी दुचाकी चालवताना अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण आणि एक तरुणी नियम मोडत आहेत. या तरुणांनी हेल्मेट न घालता ट्रीपल सीट प्रवास केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे ट्रिपल सीट असताना मागचे तरुण-तरुणी किस करताना दिसत आहेत. भर रस्त्यात दुचाकीवर तरुणांचे अश्लील चाळे सुरु आहेत. हा व्हिडिओ बंगळूरूचा असल्याचे म्हटले जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर bengaluruupdates या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बंगळूरु पोलिसांनी यावर कारवाई केली आहे. या तरुणांना आणि तरुणीला शोधून त्यांना 5000 रुपयांचा भूरदंड भरायला लागला आहे. बंगळुरू वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचालक तरुण मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो. तो म्हैसूरला पळून गेला होता. त्याने त्याचा मोबाईलही बंद केला होता. आरटीओ रेकॉर्डमधून पोलिसांनी पत्ता शोधून काढला आणि तरुणाचे घर गाठले. या तरुणाचे वडील सुरक्षा कर्मचारी आहेत. तसेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने अलीकडे असे अश्लील चाळे करण्याचे प्रमाणा वाढले आहे. तरुणांना कोण्त्याही प्रकारची लाज राहिलेली नाही. तर दुसऱ्या एका युजरने अरे किस कशाला करायचे वाचला असता ना असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.