
Woman Sexual Assault on road in Nalanda Bihar Viral Video crime news
Bihar Woman Viral Video : बिहार : महिलेला आईचा आणि देवीचा दर्जा देणाऱ्या आपल्या देशामध्ये दुर्दैवाने महिला सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. बिहारमध्ये (Bihar News) शरमेने मान खाली जाईल अशी धक्कादायक घटना घडली आहे. दुकानामध्ये सामान आणायला गेलेल्या महिलेवर भररस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) देखील करण्यात आल्या. या संतापजनक प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बिहारमधील नालंदा येथे भररस्त्यात महिलेवर सामुहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. यावेळी इतर उपस्थित लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. बिहारमधील एका महिलेवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा २६ मार्चचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नालंदा जिल्ह्यातील अजयपूर गावातील या व्हिडिओमध्ये काही गावकरी एका महिलेला वाईट वागणूक देताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक पुरुष तिला अयोग्यरित्या पकडून ठेवलेले आणि ती सुटकेसाठी धडपडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये दंगलीचा भडका? भरदिवसा पुरातन मंदिर तोडण्याचा प्रयत्न
पीडित महिला किराणा दुकानातून सामान खरेदी करून घरी परतत होती. वाटेत दबा धरून बसलेल्या काही तरुणांनी त्या महिलेला घेरले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने विरोध करत आरडाओरडा केला, तेव्हा आरोपींनी तिचे कपडे फाडून तिच्यावर अत्याचार केला. गावकरी जमा झाल्यावर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, पळून जाण्यापूर्वी त्यांनी या लज्जास्पद कृत्याचे व्हिडिओ काढले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी त्या महिलेला शिवीगाळ करताना आणि त्रास देताना दिसत आहेत.
नीतीश कुमार के गृह जिला नालंदा में महिला से गैंगरे’प की कोशिश की गई, और डबल इंजन की सरकार कुर्सी के खेल में व्यस्त है। pic.twitter.com/eAnWOrAu81 — Jan Suraaj (@jansuraajonline) March 31, 2026
पोलिसांनी दोन जणांना अटक करुन कारवाई
या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती महाराष्ट्रात मजूर म्हणून काम करतो आणि घटना घडली तेव्हा तो गावात नव्हता. या घटनेबद्दल कळल्यानंतर तो काल नालंदा येथे आला. पीडितेच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत माध्यमांशी संवाद साधला.
हे देखील वाचा : मोफत गॅस सिलिंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
पीडितेने काय सांगितले?
महिलेच्या म्हणण्यानुसार, ती पैसे जमा करण्यासाठी एका दुकानात गेली असताना काही गावकऱ्यांनी तिला पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी याचे व्हिडिओ देखील काढले. तसेच हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेला तीन मुले आहेत. तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की त्यांना न्याय हवा असून सर्व नराधम लोकांना शिक्षा झाली पाहिजे.