कहा कहा से आते है ऐसे लोग...! नाकात कॅमेरा घालून महिलेने गिळली अख्खी तलवार... पाहूनच उडेल थरकाप; Video Viral
सोशल मिडियावर दररोज अनेक अशा विचित्र आणि थक्क करणाऱ्या गोष्टी शेअर केल्या जातात, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. स्वत:ला व्हायरल करण्यासाठी लोक इथे अनेक नको नको त्या गोष्टी करु पाहतात आणि यात यशस्वीही होतात. अशातच आता अलिकडे इंटरनेटवर एक अनोखा आणि सर्वांना अचंबित करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका महिलेने आपल्या तोंडात चक्क भलीमोठी तलवार घुसवल्याचे दृश्य दिसून आले. यावेळी तिने तिच्या नाकात एक कॅमेराही घुसवला ज्यात तलवार आत गेल्यानंतर काय घडले ते थरार दृश्य दिसून आले. महिलेचा हा पराक्रम सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा असून याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. चला हे नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय आहे प्रकरण?
नाकात कॅमेरा घालून तोंडात तलवार गिळणाऱ्या या महिलेचं नाव जिन मिन्स्की असं आहे. तिने केलेला हा पराक्रम खरंतर तिच्या व्यावसायाचा एक भाग आहे. न्यूयाॅर्क पोस्टच्या वृत्तानुसार, तिने अलीकडेच तिच्या घशाच्या एंडोस्कोपिक तपासणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती १८ इंचाची एक तलवार गिळताना दिसून आली. मिन्स्कीचा हा व्हिडिओ मिडटाउन ईस्ट येथील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये शूट केला. तिने तलवार गिळली फक्त ही बाबच धक्कादायक नसून असं करताना हा सर्व प्रकार तिने नाकात कॅमेरा घालून याचे लाईव्ह फुटेज कॅमेरात कैद केला. व्हिडिओतील हा संपूर्ण प्रकार पाहून लोक अवाक् झाली तर काहींते डोळे हे सर्व पाहून विस्फारुन गेले. हे दृश्य इतके अनोखे होते की सर्वांनीच त्याचा हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली.
हा व्हायरल व्हिडिओ @columbia_voice नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बापरे, तू सर्वोत्तम आहेस! तिच्या कलात्मक प्रतिभेला सलाम!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते खूपच छान आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिला असं करताना त्रास नाही झाला का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.