(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसून याचा नेम नाही. इथे नेहमीच अनेक अजब-गजब आणि आपल्या कल्पनेपलीकडची दृश्ये दिसून येत असतात. इथे अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल आणि म्हणूनच फार कमी वेळेत हे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतात. आताही एक मजेदार किस्सा इथे व्हायरल झाला आहे ज्यात आपल्याला एका पप्पीने काय काय घडू शकतं किंवा एक पप्पी किती महागात पडू शकते याचे एक मजेदार उदाहरण पाहायला मिळेल. व्हिडिओतील दृश्ये फारच मनोरंजक असून ती पाहताच तुमच्यावर चेहऱ्यावर हसू उमलेलं. चला तर मग यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ हा नक्कीच सर्वांना खळखळून हसवणारा आहे. यात आपल्याला एका ठिकाणी काही लोक जमलेली दिसून येतात. सर्वजण एका बाकड्यावर बसलेली असतात आणि याचवेळी तिथे एका मुलीची एंट्री होते. ती मोठ्या शानात तिथे एंट्री घेते आणि रँम वाॅक करत सर्वांसमोर आपली कला सादर करत असते. सर्वजण तिला पाहून खुश होतात आणि जोरजोरात टाळ्याही वाजवू लागतात. पण तेवढ्यातच एक अशी घटना घडते की तिथलं संपूर्ण वातावरणच बदलून जात. मुलगी रँम वाॅक करत जात असतानाच बाकड्यावर बसलेल्या लोकांकडे बघत त्यांना फ्लाईंग किस देते ज्यानंतर अचानक बाकडा आणि त्यावर बसलेली सर्व लोक धड्डाम करुन खाली कोसळतात. हे दृश्य अवघ्या काही सेकंदातच पार पडते, ही घटना खरंच अशाप्रकारे घडून आली की ती मुद्दाम घडवून आणली हे अद्याप स्पष्ट झाले नाही पण याचा व्हिडिओ मात्र आता सर्वांनाच हसवण्याचे काम करत आहे.
या घटनेचा व्हिडिओ @vincent_tran6395 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एक चुंबन पुरेसे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हसले आणि क्षणातच गायब झाले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चुंबनाची ताकदचं मोठी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.