आसमान से गिरे खजूर मे अटके! सिंहाच्या तावडीतून सुटला पण थेट मगरीच्या जबड्यात पडला झेब्रा, थरारक Video Viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही सतत व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही वन्यजीव प्राण्यांचे देखील अनेक व्हिडिओ पाहायाल मिळतात. मानवाप्रमाणे त्यांच्याही जीवानात अनेक संघर्ष असतात. कधी कुठून कोणते संकट येईल याची कल्पना देखील करता येत नाही. अनेकदा एकावेळी दोन संकटे समोर उभी राहतात. अशा परिस्थितीही आपण टिकून राहणे, त्या संकटाचा सामना करणे महत्त्वाचे असेत हे या प्राण्यांकडून शिकायला मिळते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक झेब्रा आपल्या जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. आसमान मे गिरा खजूर मे अटका ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. याचा अर्थ एका संकटातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत दुसरे संकट उभे राहते. असेच काहीसे या झेब्रासोबत घडले आहे. एक झेब्रा सिंहाच्या तावडीत अडकला होता, त्याच्यापासून अत्यंत कष्टाने त्याने आपली सुटका तर करुन घेतली. पण दुसरीकडे आणखी एक संकट त्याची वाट पाहत होते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक झेब्राला सिंहाने पकडलेले आहे. त्याच्या तावडीतून सुटण्याचा झेब्रा अतोनात प्रयत्न करत आहेत. नदीच्या काठावर हा संघर्ष सुरु आहे. झेब्रा स्वत:ला सिंहाच्या तावडीतून सोडवूनही घेतो, पण यावेळी तो थेट पाण्यात पडतो. जिथे एक मगर घात घालून पाण्यात लपलेली असते. तिथेही त्याचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरु होतो. पण दुर्दैवाने आपल्या जीवाला मुकतो. पण झेब्रा शेवटपर्यंत संकटाचा सामना करत राहतो.
हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @wildfriends_africa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, माझ्या जीवनही असे झाले आहे, एकामागून एक प्रॉब्लेम येत राहतात, तर दुसऱ्या एकाने हेच तर जीवन आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने यावर दु:ख व्यक्त करत किती क्रूर आहे हे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अश्लीलतेचा कळस! बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स; आधी मिठी मारली मग… Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.