रील बनली पण जीव गेला! पाण्याच्या प्रवाहाने क्षणार्धात महिलेला आत खेचले, मुलगी आई-आई करत ओरडत राहिली पण... थरारक Video Viral
आजकाल लोक रिल्ससाठी इतके वेडे झाले आहेत की लोक आपल्या जीवाचाही विचार करत नाहीत. सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ लोक आवडीने पाहतात. मात्र स्वतःला व्हायरलसाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. त्यांच्या व्हायरल होण्याच्या या संकल्पनेत ते बऱ्याचदा अपयशीही ठरतात. नको नको ते स्टंट्स, जुगाड करताना ते उलटे पडतात आणि लोकांना याची मोठी भरपाई द्यावी लागते. आताही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असेच काहीसे घडताना दिसून आले. यात एक बनवणं तरुणीला इतकं महागात पडलं की तिचा जीवच पणाला लागला. व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
बापरे! अचानक कारच्या डिकीतून बाहेर आला हात, पाहून सर्वांचा उडाला थरकाप; नवी मुंबईतील Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सध्या एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये व्हिडिओ शूट करताना काही सेकंदातच एक महिला गंगा नदीत बुडून गेल्याचे दिसून येते. यावेळी मुलगी एक निष्पाप मुलगी मम्मी-मम्मी ओरडत राहते. ती ओरड इतकी त्रासदायक होती की व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून लोक आता यातील दृश्ये पाहून हादरले आहेत.
ही घटना उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील मणिकर्णिका घाट येथे घडली. आपल्या कुटुंबासह येथे भेट देण्यासाठी आलेल्या एका नेपाळी महिलेचा भागीरथी नदीत रील बनवताना वाहून जाणे झाले. ही घटना काल म्हणजेच सोमवारी दुपारी घडल्याचे सांगितले जात आहे. गंगा घाटाच्या काठावर एक महिला रील बनवत होती. पाणी खूप थंड होते आणि प्रवाह खूप वेगवान होता. ती महिला कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजनांशिवाय नदीत उतरली आणि रील बनवू लागली. त्यावेळी अचानक महिलेचा पाय घसरला आणि ती नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली.
अपघातानंतर लगेचच तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काहीही समजले नाही, असे व्हिडिओमध्ये दिसून येते. त्या महिलेची लहान मुलगी घाटावर उभी राहून “मम्मी-मम्मी” असे ओरडत राहिली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कारवाई केली आणि एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. तथापि, बचाव पथकाने मोठ्या प्रमाणात शोध घेऊनही, महिलेचा शोध लागला नाही. सोशल मीडियावर काही शुल्लक लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक किती दूर जाऊ शकतात हे पुन्हा या व्हिडिओतून पाहता येते.
मौत का ये खतरनाक वीडियो उत्तरकाशी में गंगा नदी का है..
आग और पानी से खिलवाड़ नहीं करना चाहिए.. बावजूद इसके रील बनाने के लिए लोग अपनी जिंदगी तक दांव पर लगा दे रहे हैं.. देखिए कैसे ये युवती तेज बहाव वाली नदी में उतरकर रील बना रही थी. पानी बहुत ठंडा था.. लहरों ने बैलेंस बिगाड़ा..… pic.twitter.com/2UnO47etOC— Vivek K. Tripathi (@meevkt) April 16, 2025
संजना गणेशनच्या प्रश्नावर क्लीन बोल्ड झाला KL राहुल; दिले असे उत्तर… इंटरव्यूचा Video Viral
प्रशासनाने इशारा दिला आहे की पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी नदीकाठाजवळ किंवा धोकादायक भागात अत्यंत सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करताना सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @meevkt नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “समाज रील जुगाराच्या प्राणघातक साथीने ग्रस्त आहे, तरुण असोत, मुले असोत, महिला असोत किंवा मध्यमवयीन असोत, सर्वजण त्याच्या विळख्यात सापडले आहेत. सर्वांची मानसिक स्थिरता गेली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अत्यंत दुःखद घटना, दिखाव्याच्या नावाखाली निष्पाप मुलांनी त्यांची आई गमावली”.