अचानक कारच्या डिक्कीतून बाहेर आला हात, पाहून सर्वांचा उडाला थरकाप; नवी मुंबईतील Video Viral
वाशी आणि सानपाडा रेल्वेस्थानकांदरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका कारच्या डिकीमधून बाहेर लटकत असलेल्या एका हाताचा व्हिडीओ नवी मुंबईतील एका रहिवाशाने रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो झपाट्याने व्हायरल झाला. व्हिडिओतील प्रकार पाहून आता युजर्स घाबरले असून काहींनी याला गंभीर स्वरूप देत त्वरित पोलीस कारवाईची मागणी केली आहे. नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडीओमध्ये एक सफेद रंगाची कार रस्त्यावरून जाताना दिसते. इथपर्यंत सर्व ठीक असतानाच अचानक त्या गाडीच्या डिकीमधून एक मानवी हात बाहेर येतो. हा प्रसंग पाहून व्हिडीओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणतो, “या गाडीच्या डिकीमधून एक हात निघाला आहे… बघा बघा… कदाचित हा मृतदेह आहे!” त्याचा स्वर घाबरलेला आणि चिंतेने भरलेला होता, ज्यामुळे व्हिडीओ पाहणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.या व्हिडीओला मिळालेल्या प्रतिसादामुळे नवी मुंबई पोलीस तात्काळ हालचालीत आले. त्यांनी व्हिडीओच्या आधारे गाडीचा तपास सुरू केला आणि संबंधित वाहनाचा शोध घेण्यात आला.
संजना गणेशनच्या प्रश्नावर क्लीन बोल्ड झाला KL राहुल; दिले असे उत्तर… इंटरव्यूचा Video Viral
तपासादरम्यान पोलिसांना हे आढळून आले की, तीन मुले त्यांच्या लॅपटॉपची जाहिरात करण्यासाठी रिल्स बनवत होते. वाशी आणि सानपाडा रेल्वेस्थानकांदरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका कारच्या डिकीमधून बाहेर येणाऱ्या हाताचा एक व्हिडीओ नवी मुंबईतील एका रहिवाशाने रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो झपाट्याने व्हायरल झाला. व्हिडीओ पाहून अनेक नागरिक चक्रावून गेले असून, काहींनी याला गंभीर स्वरूप देत त्वरित पोलीस कारवाईची मागणी केली.
व्हिडीओमध्ये एक सफेद रंगाची कार वाशी-सानपाडा रस्त्यावरून जाताना दिसते आणि अचानक त्या गाडीच्या डिकीमधून एक मानवी हात बाहेर येतो. हा प्रसंग पाहून व्हिडीओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणतो, “या गाडीच्या डिकीमधून एक हात निघाला आहे… बघा बघा… कदाचित हा मृतदेह आहे!” त्याचा स्वर घाबरलेला आणि चिंतेने भरलेला होता, ज्यामुळे व्हिडीओ पाहणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
या व्हिडीओला मिळालेल्या प्रतिसादामुळे नवी मुंबई पोलीस तात्काळ हालचालीत आले. त्यांनी व्हिडीओच्या आधारे गाडीचा तपास सुरू केला आणि संबंधित वाहनाचा शोध घेण्यात आला.तपासादरम्यान पोलिसांना हे आढळून आले की, तीन मुले एका लॅपटॉपच्या जाहिरातीसाठी रिल्स तयार करत होते. “ही मुले मूळची मुंबईची असून, ती नवी मुंबईत केवळ एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आम्ही तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली. आमच्या तपासात आम्हाला कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही,” अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय लांडगे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, “सर्व संबंधितांची विचारपूस केली असून, हा प्रकार केवळ मस्करीचा एक भाग होता, असं स्पष्ट झालं आहे. कुणाच्याही जिवाला धोका झाला नाही आणि कायद्याचा भंगही झालेला नाही. मात्र, अशा प्रकारामुळे भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं, त्यामुळे आम्ही त्या युवकांना समज देऊन सोडले आहे. नागरिकांनी अशा कृतींपासून दूर राहावं आणि काहीही शंका वाटल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.