वेगाने धावणाऱ्या प्राण्याला एक महिला लहान मुलाप्रमाणे अंघोळ घालत आहे
आत्तापर्यंत कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यांसारखे पाळीव प्राणी अनेक लोक पाळतात. पण काही असे लोक असतात ज्यांना वन्य प्राणी पाळायला खूप आवडते. दुबईतील अनेक व्यक्तींकडे असे प्राणी असल्याचेही आपण ऐकले आहे. पण ह्या वन्य प्राण्यांपासून धोका असला तरीही ते लोक घाबरत नाहीत.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, पण काही व्हिडीओ असे असतात जे अगदी वेगळे असतात. चला आम्ही तुम्हाला अशाच एका जंगली प्राण्याशी संबंधित व्हिडिओ दाखवतो, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. अशाच एका व्हिडीओमध्ये वेगवान स्पीडसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या जॅग्वारला एका महिलेने अशा प्रकारे अंघोळ घातली की पाहणारे थक्क झाले आहेत. महिलेची स्टाईल पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की ती एखाद्या जंगली प्राण्यासोबत राहते. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जॅग्वारला पाळीव मांजरीत बदलले!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला ला अंघोळ घालताना दिसत आहे. तिने जॅग्वारला पाण्याने भरलेल्या एका टबमध्ये उभे केले आहे. ती हातात पाण्याचा पाइप घेऊन त्याला आंघोळ घालत आहे. तिला याची अजिबात भीती वाटत नाही. ती त्याला अगदी लहान मुलाप्रमाणे घासते आणि आंघोळ घालते. त्याच्यावर प्रेम करते. जॅग्वार सुद्धा पूर्ण शांततेत अंघोळ करत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत
Tank the jaguar enjoying his bath. pic.twitter.com/LwcwVHOVXB
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) June 14, 2024
लोक म्हणाले – तू वेडी झाली आहेस का?
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जवळपास एक कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि लाखो लोकांनी लाइकही केले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले- ‘भाऊ, एवढी मोठी चूक कोणीही कशी करू शकते.’ आणखी एका युजरने लिहिले की ‘अशा प्राण्यांना पाळणे खूप धोकादायक आहे.’ तर तिसऱ्या एकाने म्हणले आहे की, ‘तू वेडी झाली आहेस का?’