Young man feeds bear cold drink for reel video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नसल्याने अनेक धक्कादायक गोष्टी देखील पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूज साठी स्वत:च्या आणि आसपासच्या लोकांचा जीव धोक्यात घालताना दिसतात. धोकादायक स्टंटबाजीचे प्रमाण अत्यंत वाढत चालले आहे. आता मानवाने यामध्ये प्राण्यांना देखील ओढले आहे. प्राण्यांसोबत देखील धोकादायक स्टंट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये एक तरुण अस्वाला कोल्ड्रिंक्स पाजत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जंगलामध्ये आहे. याच वेळी त्याच्यासमोर एक अस्वल आहे. हा तरुण अस्वलासमोर जाऊन कोल्डड्रिंक्स ठेवतो. त्यानंतर अस्वल ते घेऊन गटागटा पिऊन टाकतो. परंतु तरुणाच्या या बेजबाबदार पणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्राण्यांना त्यांच्यासाठी काय चांगले काय वाईट हे समजत नाही, अशा वेळी हे लोक याचा फायदा घेतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात. हा व्हिडिओ कितीह मजेशीर वाटत असला तरी धोकादायकही आहे. मानवी पेय प्राण्यांसाठी धोकादायक ठरु शकते. यामुळे अस्वालाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या हा व्हिडिओ कुठाला आहे याची माहिती आणि अस्वलाला काही झाले नाही ना याबद्दल काही कळू शकलेले नाही. पण सध्या हा व्हिडिओ प्राणीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण बनलेला आहे.
व्हायरल व्हिडिओ
रील के चक्कर में भालू को पिला दी कोल्ड ड्रिंक,
कांकेर में युवक का भालू को कोल्ड ड्रिंक पिलाने का वीडियो वायरल हुआ है। यह हरकत युवक के जान को खतरे में डालने के साथ ही भालू के स्वास्थ्य के साथ भी खिलवाड़ है…#chhattisgarh #kanker #animals #colddrink #Bears pic.twitter.com/AajmaPQOSn— Khushbu_journo (@Khushi75758998) September 12, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Khushi75758998 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी संबंधित तरुणावर आणि व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. सध्या प्राणी प्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
पाणीपुरीच्या ‘त्या’ व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ; किंमत ऐकूनही चक्रावले नेटकरी, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.