याला म्हणतात खरं प्रेम! त्याचा अपघात होऊनही 'तिने' सोडली नाही साथ, हॉस्पिटलमध्येच केले लग्न, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
असे म्हणतात लग्न हे आयुष्यात एकदाच होते. यामुळे जोडीदार योग्यच निवडवा. गेल्या काही काळात विवाह बाह्य अफैर, तसेच लग्नानंतर दुसऱ्यावर प्रेम असल्याने नवऱ्याला/नवरीला मारण्याच्या घटना, तसेच हुंड्यामुळे बळीच्या घटांनामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे तरुण आणि तरुणांमध्ये लग्ननाती भीती निर्माण झाली आहे. अनेक जण लग्नाला नकार देत आहे. पण अशातही काही अशी उदाहरणे पाहायला मिळत आहे, जिथे आपल्या होणाऱ्या नवऱ्यावर, प्रियकरावर विश्वास ठेवून आयुष्यभर त्याची साथ देतात. अशी काही उदाहरणे आपल्याला पाहायलाही मिळतात.
खरे तर प्रेम म्हणजे केवळ सुखातच नाही, तर दु:खाच्या काळातही एकमेकांची साथ देणे, एकमेकांवर विश्वास ठेवून नात्याला बळ देणे ज्यामुळे आयुष्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होते. प्रेम हे परिस्थिती पाहून नाही, तर विश्वास, समर्पण आणि साथ यांच्या समीकरणातून तयार होते. या खऱ्या प्रेमाचं जिवंत उदाहरण आज पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाचा भीषण अपघात घडला होता. लग्नाच्या काही दिवस आधीच ही दुर्घटना घडली. पण तरुणाची ही परिस्थिती पाहून मुलीने त्याची साथ सोडली नाही. डॉक्टरांनी तरुणाला आराम करायला सांगतिल्याने हॉस्पिटलमध्येच मंडप उभारण्यात आला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून शकता की, एक तरुण हॉस्पिटलच्या बेडवर लेटलेला आहे. त्याच्या हाता पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे. येथे एक तरुणी त्याच्यासोबत सात फेरे घेत आहे. काही मोजकेच लोक इथे उपस्थित आहे, पण या अनोख्या आणि खऱ्या प्रेमाने अनेकांची मने जिंकली आहेत. व्हायरल व्हिडिओवरुन अंदाज लावू शकतो की हा व्हिडिओ कोलकातामधील असेल परंतु याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
पाणीपुरीच्या ‘त्या’ व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ; किंमत ऐकूनही चक्रावले नेटकरी, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ghoshpampa165 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे, पण काही टीका करणारे लोक देखील आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
प्रेमाला नाही वयाचं बंधन! आजींसाठी आजोबंच्या ‘या’ Gesture ने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.