पाणीपुरीच्या 'त्या' व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ; किंमत ऐकूनही चक्रावले नेटकरी, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
Avocado Panipuri Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. यामुळे कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी कोणी विचित्र डान्स करताना दिसते, तर कधी कोणी धोकादायक स्टंट करताना दिसतात. कधी कोणाची भांडणे पाहायाल मिळतात, तर कधी कोणाचे जुगाड पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ पाहून हसावे का रडावे कळत नाही, तर काही व्हिडिओ खरचे कौतुकास्पद असतात. यामध्ये तुम्ही खाद्यपदार्थ्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. स्ट्रीट फूड व्लागचे व्हिडिओ, तर कधी या देशी खाद्यपदार्थांचे फ्यूजनचे व्हिडिओ पाहायला मिळतात.
सध्या सोशल मीडियावर पाणीपुरीचा एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच या पणीपुरीची किंमत ऐकूनही अनेजण चक्रावले आहेत. भारताच्या वेगवेगळ्या भागात गोलगप्पा, पुचका, फुलकी, गुपचूप, गप्पा अशी वेगवेगळी नावे पाणीपुरीला आहेत. भारताच्या नागरिकांचे सर्वात आवडेत स्ट्रीट फुड आहे. यामध्ये सहसा तुम्ही बटाटा किंवा रगडा खाल्ले तुम्ही खाल्ले असेल, पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ अव्हाकाडोची पाणीपुरी तयार करण्यात आली आहे. यामुळे अनेकांनी हा त्यांच्या पाणीपुरीचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पाणीपुरी करताना दिसत आहे. यामध्ये तो अवाकाडो टाकत आहे. यामध्ये कांदा आणि टोमॅटोही टाकण्यात आला आहे. एक व्यक्ती ही पाणीपुरी चवीने खातानाही दिसत आहे. पण यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय या पाणीपुरीची किंमत ऐकूनही लोक थक्क झाले आहेत. या पाणीपुरीची किंमत तब्बल २२० रुपये आहे. लोकांनी या पाणीपुरीला आपली नापसंती दर्शवली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
बाप रे! दिल्ली मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान राडा; एकाने चप्पल काढली अन्.., VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @foodelhi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने सुर्यवंशम मध्ये अमिताभ बच्चनने हीच खीर खाल्ली होती असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आमच्या पाणीपुरीची वाट लावली सगळी असे म्हटले आहे. तर यामध्ये एका परदेशी व्यक्तीने हे भारतीय फ्यूजन पाहून आनंद झाला, आता भारतीयांना इटालियन लोकांची स्थिती समजेल असे म्हटले आहे.
मुंबई लोकल पुन्हा चर्चेत! एका सीटवरुन वाद अन् एकमेकांच्या जीवावर उठले प्रवासी… भयानक VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.