Viral Video: धावत्या ट्रेनमधून उतरत होता तरूण अन्...; पुढे जे घडले तुम्हीच पाहा
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. कधी भांडणाचे, स्टंटचे जुगडाचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच वेगवेळ्या गाण्यांवर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये डान्सचे देखील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. याशिवाय तुम्ही सत्य घटनांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहिले असतील.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मुंबईत घडली असल्याचा दावा करण्यात आला आहे. जिथे लोकल ट्रेन दररोज लाखो लोकांसाठी महत्त्वाच्या आहेत. अनेक वेळा लोक एवढ्या घाईत असतात की ते उतरताना खबरदारी घेत नाहीत, त्यामुळे अनेकदा अपघात होतात. या व्हिडिओमध्ये प्रवासी ट्रेनमधून उतरताना कसा अडचणीत येतो हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रवासी ट्रेनमधून पडला
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रवासी ट्रेनच्या दारात उभे आहेत. अनेकजण प्लॅटफॉर्म जवळ येताच ट्रेन थांबायच्या आधी जवळ येतात. त्यातच एख प्रवासी इतका घाईत असतो की तो ट्रेन थांबण्याचीही वाट बघत नाही. प्रवासी उतरू लागतो तेव्हा ट्रेन थांबलेली नसते. दोन तरूण तसेच चालत्या ट्रेनमधून उतरतात. पण गाईत असलेला प्रवासी एकदम काली पडतो. पण तो पडताच त्याच्या आसपास असलेले लोक लगेच पकडतात त्यामुळे तो ट्रेन खाली पडत नाही. व्हिडिओवरून वाटते की त्याला चांगलीच दुखापत झाली असणार पण त्याचे नशीब चांगले होते की तो रुळाखाली पडला नाही.
हे देखील वाचा- उठा उठा दिवाळी आली! अलार्म काका नाही तर तात्या विंचू आला…; मजेशीर व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
ट्रेनमधून उतरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हे या घटनेने दाखवून दिले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @suraj_patel_jj या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. यामध्ये सुचना आमि सल्ले दिले आहे. एका युजरने म्हटले आहे की, यासारखे व्हिडिओ ट्रेनमधून प्रवास करताना नेहमी सावध राहण्याची आठवण करून देतात. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, छोट्याशा निष्काळजीपणामुळेही मोठा अपघात होऊ शकतो, त्यामुळे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.