फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे आश्चर्यात्मक व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर धक्का बसतो. तर अनेकदा हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट, कधी भांडण, कधी जुगाड, असे अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच तुम्ही अनेक फॅशनचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. हेअरस्टाईल, मेकअप, ड्रेसिंग याबद्दल अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक दिवाळी स्पेशल हेअरस्टाईलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. एका महिलेने अशी हेअरस्टाईल केली आहे की, बघितल्यावर तुम्ही देखील चक्रावाल. कारण या महिलेने डोक्यामध्ये फटाकडे लावून हेअरस्टाई केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडिओ आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला अनोख्या लूकमध्ये आपले केस सजवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, सर्वात आधी महिलेने केसाचा बन तयार करून त्यामध्ये फुलबाजा लावले आहेत. त्यानंतर ती तिच्या केसांमध्ये छोटे सुतळी बॉम्ब लावते. तसेच चक्री बॉम्बही लावते. सर्व फटाके वेगवेगळ्या ठिकाणी लावून महिलेने केस सजवले आहेत. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अशी हेअरस्टाईल करणे धोकादायक देखील आहे. या महिलेला गंभीर दुखापत देखील होण्याची शक्यता आहे.
व्हायरल व्हिडिओ
एक माचिस और खेल खत्म
😜😜😜😜😜😜 pic.twitter.com/yKPiqxEQbu— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) October 27, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHaiया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना ‘एक माचिस आणि खेळ संपला’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत हजारोहून अधिक लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले आहे की, आता एवढंच बघायचं बाकी होते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, चुकून जर फटाके पेटले तर.. तिसऱ्या एकाने म्हटले आहे की, एक स्पार्क आणि गेम संपला. येथे वेड्यांची कमतरता नाही असेही एका युजरने म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.