वॉशिंग्टन: अमेरिकेतील सेंट्रल पेनसिल्व्हेनिया येथील एका रुग्णालयात शनिवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच गोळाबार करणारा हल्लेखोर पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे. ही घटना यूपीएमसी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घडली. पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी या घटनेची माहिती देत सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले.
I’ve been briefed on the tragic shooting at UPMC Memorial Hospital in York County and I am on my way to the scene. The hospital is now secure and members of the @PAStatePolice and @PEMAHQ are on the ground responding alongside our local and federal partners. Follow the… — Governor Josh Shapiro (@GovernorShapiro) February 22, 2025
पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी म्हटले की, यॉर्क काउंटीमधील यूपीएमसी मेमोरियल हॉस्पिचमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून मी घटनास्थळी पोहोचलो आहे. रुग्णालय आता सुरक्षित आङे आणि स्थानिक व संघीय भागीदारांसह पोलिस देखील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आहेत.” तसेच स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश आणि परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहेत.
हल्लेखोर ठार
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात हल्लेखोरासोबतच्या चकामकीत दोन पोलिस अधिकारी आणि एक नर्स जखमी झाले आहेत. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने अचानक गोळीबार सुरू केला, मात्र पोलिसांनी वेळीच प्रत्युत्तर देत त्याला ठार केले.
कोणतीही जिवीतहानी नाही
रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणताही रुग्ण जखमी झालेला नाही आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सध्या कायदा अंमलबजावणी यंत्रणा पुढील तपास करत आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये लोक घाबरून पळताना आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी पोहोचताना दिसत आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आणि तपास सुरू केला.
🚨🇺🇸#BREAKING | NEWS ⚠️
Active shooter situation at UMPC hospital in York, Pennsylvania story is still developing multiple victims reported pic.twitter.com/GqOAqWMtiE — Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) February 22, 2025
यापूर्वी देखील अशाच घटना घडल्या आहेत
शुक्रवारी (21 फेब्रुवारी) अमेरिकेच्या लुईसव्हिल शहरात देखील एका मोटार वाहन कार्यालयात अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, गेल्या महिन्यात न्यू ऑर्लिन्समध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. एका ट्रकने गर्दीत घुसून अनेक लोकांना चिरडले आणि त्यानंतर ड्रायव्हरने बंदुकीने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते.






