अमेरिकेत दिवसाढवळ्या अंदाधुंद गोळीबार; मोटार वाहन कार्यालयाबाहेर 3 जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या लुईसव्हिल शहरात शुक्रवारी (21 फेब्रुवारी) एका मोटार वाहन कार्यालयात अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थळी बंदोबस्त करण्यात आला असून घटनेची चौकशी सुरु आहे. अमेरिकेत अशा घटानांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही न्यू ऑर्लिन्समध्ये गोळीबाराची घटना घडली होती.
3 जणांवर गोळीबार
लुईसव्हिल मेट्रो पोलिस विभागाचे मेजर डोनाल्ड बोएकमॅन यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पोलिसांना घटनास्थळी एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळला, तर दोन जण गंभीर जखमी होते. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हल्लेखोर फरार
हल्लेखोराला घटनास्थळावरुन पळून जाण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर एकटा होती की त्याचे साथीदारही त्याच्यासोबत होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या प्रकरणाछ्या चौकशीसाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु आहे. मात्र, पोलिसांनी नारगिकांना आश्वत केले आहे की, सध्या कोणालाही धोका नाही.
मागील महिन्यात न्यू ऑर्लिन्समध्येही हल्ला
यापूर्वी अमेरिकेत अशा प्रकारच्या हल्लांच्या अनेक घटना घडल्या आहे. गल्या महिन्यात न्यू ऑर्लिन्समध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. एका ट्रकने गर्दीत घुसून अनेक लोकांना चिरडले आणि त्यानंतर ड्रायव्हरने बंदुकीने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते.
पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले
पोलिसांनी या हल्ल्यानंतर तात्काळ कारवाई करत ट्रक ड्राव्हरला ठार केले. स्थानिक पोलिस आणि एफबीआयने या घटनेची चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला दहशतवादाशी संबंधित नसल्याचे सांगण्यात आले. घटनेच्या वेळी रस्त्यावर मोठी गर्दी होती आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही घटना पाहणाऱ्यांच्या मते, ट्रक चालक ट्रकमधून उतरल्यावर थेट लोकांवर गोळीबार करू लागला, त्यामुळे अनेक जण जागीच मृत झाले.
सरकार आणि कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेतील बंदुकधारी हल्ल्यांच्या घटनांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सरकार आणि कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये वारंवार निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी सरकारला कडक बंदूक नियंत्रण कायदे करण्याची गरज आहे, अशी मागणी केली जात आहे.