
10 people arrested in connection with lynching of Hindu youth in Bangladesh violence security beefed up at Indian High Commission
Dipu Chandra Das lynching Bangladesh news : शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थिती आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत घडलेल्या घटनांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. एका बाजूला तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर देश पेटला असतानाच, मयमनसिंग जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने केलेल्या हत्येने (Lynching) माणुसकीला काळीमा फासला आहे. या वाढत्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, भारतातील राजनैतिक कार्यालयांना लक्ष्य केले जात असल्याने सिल्हेट आणि चितगावमध्ये हाय-अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मयमनसिंग जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. २५ वर्षीय हिंदू तरुण दीपू चंद्र दास याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप ठेवून संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण केली. केवळ मारहाणीवरच हा जमाव थांबला नाही, तर त्यांनी दीपूचा मृतदेह एका झाडाला लटकवून जाळून टाकला. या अमानवीय घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे. बांगलादेश पोलिसांनी आणि रॅपिड ॲक्शन बटालियनने (RAB) या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून, अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. अंतरिम सरकारने या घटनेचा निषेध केला असला तरी, अल्पसंख्याक समुदायामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ
बांगलादेशातील भारतविरोधी शक्तींनी आता आपला मोर्चा भारतीय राजनैतिक कार्यालयांकडे वळवला आहे. सिल्हेटमधील भारतीय सहाय्यक उच्चायोग कार्यालय आणि व्हिसा केंद्राबाहेर ‘इन्किलाब मंच’ आणि ‘गणो अधिकार परिषद’ या संघटनांनी निदर्शने केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सिल्हेटमधील भारतीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान आणि व्हिसा केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. चितगावमध्ये तर भारतीय उच्चायुक्तांच्या निवासावर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. “दिल्ली की ढाका – ढाका, ढाका” अशा घोषणा देत आंदोलक भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘They tied him to a tree, set him on fire and left his burnt body outside’ Father of Hindu man Dipu Chandra Das, who was lynched by a Muslim mob in Bangladeshhttps://t.co/nitmRrLC7f pic.twitter.com/RxYY7Az5Bb — OpIndia.com (@OpIndia_com) December 21, 2025
credit : social media and Twitter
३२ वर्षीय विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्यावर १२ डिसेंबर रोजी झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बांगलादेशात संतापाची लाट उसळली आहे. हादी यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या स्मारकाजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो समर्थकांनी आणि हादींच्या पक्षाने अंतरिम सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. “जर हादींच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक केली नाही, तर देशव्यापी उग्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tarique Rahman: कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान; ज्याच्या एका आवाजावर उभा राहतो अख्खा Bangladesh
हादींच्या मृत्यूनंतर केवळ रस्तेच नव्हे तर माध्यमांची कार्यालयेही सुरक्षित राहिलेली नाहीत. अनेक वृत्तपत्र कार्यालयांवर हल्ले करण्यात आले असून पत्रकारांना धमकावले जात आहे. ढाका आणि चितगावमधील रस्त्यांवर दगडफेक आणि तोडफोडीचे सत्र सुरू आहे. प्रशासनावरचा वचक कमी झाल्याचे चित्र दिसत असून, जमाव स्वतःच कायदा हातात घेताना दिसत आहे.
Ans: मयमनसिंग जिल्ह्यात दीपू चंद्र दास या २५ वर्षीय हिंदू तरुणाची ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने हत्या केली.
Ans: 'इन्किलाब मंच' आणि इतर संघटनांनी भारतीय कार्यालयांना घेराव घालण्याची धमकी दिल्याने आणि दगडफेकीच्या घटनांमुळे सिल्हेट आणि चितगावमध्ये सुरक्षा वाढवली आहे.
Ans: शरीफ हादी हे बांगलादेशातील युवा नेते होते, ज्यांचा १२ डिसेंबर रोजी झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला; त्यांच्या मृत्यूमुळे सध्या देश पेटला आहे.