Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : निवडणुकीपूर्वी बांगलादेशात मोठी राजकीय उलथा-पालथ; युनूस सरकारमधील मंत्री देश सोडण्याच्या तयारीत?

Bangladesh Elections : बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ उडालेला आहे. मोहम्मद युनूस सरकार निवडणुकीपूर्वीच गुपचूप देश सोडण्याच्या तयारीत आहेत. यासाठी सेफ एक्झिट प्लॅनही तयार करण्यात आला आहे. नेमका काय डाव आहे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 04:11 PM
Bangladesh Elections

Bangladesh Elections

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ
  • निवडणुकीपूर्वी देश सोडण्याच्या तयारीत युनूस यांचे मंत्रीमंडळ
  • जाणून घ्या काय आहे सेफ एक्झिट प्लॅन
Bangladesh Elections 2026 News in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) सध्या मोठी राजकीय उलाथापलथ सुरु आहे. येत्या १२ फेब्रुवारीला बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. परंतु यापूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये मोठा गोंधळ सुरु आबे. दावा केला जात आहे की अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सल्लाहार देश सोडण्याचा विचार करत आहेत. यासाठी एक सेफ एक्झिट प्लॅनची तयारीही करण्यात आली आहे.

बांगलादेशात लोकशाहीचा अंत? आगामी निवडणुकींचा निकाल आधीच ठरलाय…; हसीना यांच्या मुलाच्या दाव्याने खळबळ

मिडिया रिपोर्टनुसार, युनूस यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांनी यासाठी एक सेफ एक्झिट प्लॅनही तयार केला आहे. दावा केला जात आहे की सर्व मंत्र्‍यांनी राजनैतिक पासपोर्ट बदलून सामान्य पासपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. सहसा कोणत्याही देशातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी आपले पद सोडल्यानंतर राजकीय पासपोर्ट परत करतात. परंतु सध्या बांगलादेशात परिस्थिती उलट दिसून येते आहे. सर्व मंत्री अधिकारी राजनैतिक पासपोर्ट जमा करुन सामान्य व्हिसावर परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे.

काय आहे भिती मागचे कारण?

मिडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहेत. परंतु यापूर्वीच निवडणुकीचा निकाल ठरला अशून अनेक चाचण्यांमध्ये बांग्लादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांच्या पाठिने जनमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बीएनबीचा विजय झाल्यास युनूस सरकारमधील नेत्यांवर गंभीर कारवाई केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. याच भितीपोटी मंत्रीमंडळातील वरिष्ठ नेते, अधिकारी, सल्लागार सुरक्षित निर्गमनाचा मार्ग वापरत आहेत.

निवडणुकांचा निकाल आधीच ठरलेला?

ही माहिती समोर येण्याच्या एक दिवस आधीच शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी एक गंभीर दावा केला होता. डॉय यांच्या  मते १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकांचा निकाल आधीच निश्चित करण्यात आला आहे. निवडणुक प्रक्रिया केवळ एक दिखावा असून याची सर्व सुत्रे जमात-ए-इस्लामीच्या हाती आहेत. जॉय यांनी बांग्लादेश नॅशनल पार्टी (BNP) ला इशारा दिला आहे की, निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा विजय झाला तरी सर्व प्रक्रिया ही जमात-ए-इस्लामीच्या नियंत्रणाखाली असणार आहे.

शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशच्या युनूस सरकारमधील मंत्री राजकीय पासपोर्ट परत का करतायत?

    Ans: बांगलादेशात येत्या १२ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. परंतु या निवडणुकांचा निकाल हा BNP पक्षाच्या बाजूने लागणार असल्याची शक्यता आहे. BNP पक्षाचा विजय अंतरिम सरकारमधील अधिकाऱ्यांसाठी, नेत्यांसाीठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे युनूस सरकारमधील राजकीय पासपोर्ट परत करुन सामान्य व्हिसा पासपोर्ट घेऊन देश सोडण्याच्या तयारीत आहेत.

  • Que: बांगलादेशच्या निवडणुका कधी होणार आहेत?

    Ans: १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत.

Web Title: Bangladesh elections 2026 muhammad yunus government ministers safe excit plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.