Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

South Africa Shooting Update : ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेत गोळीबार करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ही घटना घडली असून यामध्ये लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 21, 2025 | 12:11 PM
South Africa Shooting

South Africa Shooting

Follow Us
Close
Follow Us:
  • दक्षिण आफ्रिका हादरलं
  • जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार
  • लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू
South Africa Firing News Marathi : जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ही गोळीबाराची (Firing) घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देश हादरला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ही घटना घडली आहे. यामध्ये २० जणांवर गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा

हल्लेखोरांनी काढला पळ

जोहान्सबर्गच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून हेले आहेत. तसेच या हल्ल्यामागचा हेतूही अस्पष्ट आहे. अचानक काही हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने जोहान्सबर्गच्या पश्चिम भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सध्या हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हल्ल्यात लहान मुलांसह ११ जण ठार

या हल्ल्यात ३ लहान चिमुकल्यांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्ग येथे मोठ्या सोन्याच्या खाणीजवळ गोळीबाराची घटना घडली आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रत्यक्षदर्शनींची चौकशी केली जात आहे. घटनास्थळी नेमकं काय घडले? हल्लेखोर कोण होते? त्यांचा हेतू काय होता? हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय प्रांतीय गुन्हे दृश्य व्यवस्थापन पथक देखील यासाठी आले आहे. तसेच स्थानिक गुन्हेगारी केंद्र, गंभीर गुन्हे अन्वेषण पथक, गुन्हे गुप्तचरचे देखील एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी देखील दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियाजवळ घडली होती. एका वस्तीगृहावर गोळीबारा करण्यात आला होता. यामध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्यासह १२ जण मृत्यूमुखी पडले होते.

दक्षिण आफ्रिकेत गुन्हेगारीत वाढ

गेल्या काही काळात दक्षिण आफ्रिकेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. २०२५ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान पोलिसांनी बेकयायदेशीर दारुविरोधात कारवाई केली होती. याअंतर्त १२ हजार ठिकाणे बंद करण्यात आली होती. तर १८ हजाराहून अधिकांना अटक झाली होती. संयुक्त राष्ट्राच्या ड्रग्ज आणि गुन्हेगारी कार्यालयाच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेत गेल्या दोन वर्षात १००,००० लोकांमागे ४५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण आफ्रिकेत कुठे घडला गोळीबार?

    Ans: दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे मोठ्या सोन्याच्या खाणीजवळ गोळीबार घडला आहे.

  • Que: दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे झालेल्या ताज्या गोळीबाराच्या घटनेत किती जीवतहानी झाली?

    Ans: दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे झालेल्या ताज्या गोळीबाराच्या घटनेत ३ लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जखमी झाले आहेत.

Web Title: 11 killed many injured as gunmen open fire in johannesburg south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Firing News
  • South Africa
  • World news

संबंधित बातम्या

OPERATION HAWKEYE STRIKE : सीरियात ISIS नेटवर्कला मोठा धक्का; अमेरिकेने लष्करी कारवाई करत दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त
1

OPERATION HAWKEYE STRIKE : सीरियात ISIS नेटवर्कला मोठा धक्का; अमेरिकेने लष्करी कारवाई करत दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त

Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला
2

Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला

रशियाचा कहर! युक्रेनच्या ओडेसा बंदरावर घातक प्रहार ; हल्ल्यात ८ जण ठार, अनेक जखमी
3

रशियाचा कहर! युक्रेनच्या ओडेसा बंदरावर घातक प्रहार ; हल्ल्यात ८ जण ठार, अनेक जखमी

Pakistani Beggars: पाकिस्तानातील किती भिकारी परदेशात मागतात भीक, आकडे वाचून डोळ्याची बुब्बुळं येतील बाहेर
4

Pakistani Beggars: पाकिस्तानातील किती भिकारी परदेशात मागतात भीक, आकडे वाचून डोळ्याची बुब्बुळं येतील बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.