Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Typhoon Bualoi : टायफून बुआलोईचा व्हिएतनामला तडाखा; पुरामुळे १० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

Typhoon Bualoi update : व्हिएतनामध्ये बुआलोई वादळाने प्रचंड विध्वंस घडला आहे. घरे, शाळा, रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पाऊस अजूनही सुरु आहे. वादळ सध्या लाओच्या दिशेने सरकत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 29, 2025 | 06:35 PM
12 People died as Typhoon Bualoi hits Vietnam

12 People died as Typhoon Bualoi hits Vietnam

Follow Us
Follow Us:
  • व्हिएतनामध्ये बुआलोई वादळाचा कहर
  • पूराच्या पाण्यात बुडून १२ जणांचा मृत्यू
  • बुआलोई वादळ लाओसच्या दिशेने सरकत आहे
Typhoon Bualoi update in marathi  : हनोई : व्हिएतनामध्ये बुआलोई वादळाने हाहा:कार माजवला आहे. रविवारी (२८ सप्टेंबर) हे वादळ व्हिएतनामच्या वायव्येकडे सरत असून ते क्वांग ट्राय आणि न्घे अन प्रांतात धडकले. यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. देशात मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार वारे वाहत आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरांची छते उडून गेली आहेत.  यामुळे पुराच्या पाण्यात बुडून १२ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

घरे, शाळा, पूल पाण्याखाली

पण बुआलोईने व्हिएतनामच्या अनेक प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणला आहे. घरे, शाळा, पूल पाण्याखाली गेले आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, व्हिएतनामध्ये थान होआ प्रांतात एका अधिकाऱ्याचा वादळी वाऱ्यामुळे अंगवार झाड पडल्याने मृत्यू झाला आहे. वाऱ्याचा वेग कमी जास्त होत असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळ लाओच्या दिशने सरकत आहे.

समुद्रकिनाऱ्यावर नऊ जणांचा मृत्यू

ह्यू शहरातही एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. शिवाय समुद्रकिनारी वादळाचा धोका जास्त असल्याने सरकारने बोटींना समुद्रात जाण्यास मनाई केली होती. यामुळे मच्छिमारांनी कामकाज बंद केले होते. पण वादळाचा वेग इतका होता की, यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील बोटींचे साखळदंड तुटले ज्यामुळे नऊ क्रू मेंबर्सचा वाहून मृत्यू झाला. सध्या आठ मच्छिमार बेपत्ता असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.

‘मी देश सोडून कुठेही पळणार नाही…’ ; सत्ता गेल्यानंतरही केपी ओलींचा माज कायम, अंतरिम सरकारवर केले गंभीर आरोप

फिलिपान्समध्ये बुआलोईचा कहर

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२६ सप्टेंबर) या बुआलोई वादळाने फिलिपाइन्समध्ये कहर केला होता. यामध्ये फिलिपाइन्समधील २० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे २३ हजारांहून अधिक कुटुंबांना फटका बसला आहे. देशात विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सध्या वाऱ्याचा वेग ताशी १३३ किलोमीटर असून वादळ लाओसाच्या दिशेने सरकत आहे. यामुळे लाओसमध्येही हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु आहेत. सध्या व्हिएतनामध्ये वादळामुळे मुसळधार पावासाचा कहर सुरुच आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. बुआलोई वादळामुळे व्हिएतनामध्ये का परिस्थिती आहे? 

सध्या व्हिएतनामध्ये बुआलोई वादळाने प्रचंड विध्वंस माजवला असून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक घरे, रस्ते, शाळा, पूल पाण्याखाली गेले आहे.

प्रश्न २. व्हिएतनाममध्ये बुआलोईमुळे किती जीवितहानी झाली? 

व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११ जण पूराच्या पाण्यात बुडून मरल पावले आहेत, तर एकाच्या वाऱ्यामुळे झाड अंगावर पडून मृत्यू झाला आहे.

प्रश्न ३. सध्या बुआलोई वादळ कुठे आणि किती वेगाने सरकत आहे? 

राष्ट्रीय हवामान विभागेन दिलेल्या माहितीनुसार, ताशी १३३ किलोमीटर वेगाने लाओसच्या दिशेने सरकत आहे.

Typhoon Bualoi: व्हिएतनामवर घोंगावतेय वादळी संकट; बुआलोई टायफूनमुळे देशातील हजारो लोकांचे स्थलांतर

 

Web Title: 12 people died as typhoon bualoi hits vietnam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.