रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़ आहे.
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ( Russia-Ukraine crisis updates ) युक्रेनविरोधात सैनिकी कारवाई ( Russia Declares War On Ukraine ) करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत. शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियाने म्हटलं आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे. पुतीन यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली. पुतिन यांच्या घोषणेनंतर काही क्षणांतच रशियाने युक्रेनवर हल्लासत्र सुरू केले. सुरूवातीला हवाई हल्ले करून युक्रेनचे लष्करी तळ लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर जल आणि भूमार्गे हल्ले सुरू झाले. रशियन सैन्याची वाहने क्रिमियामार्गे युक्रेन सरकारनियंत्रित भागांत घुसविण्यात आली. युक्रेनमधील हवाई तळांसह ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे.
[read_also content=”कोरोनाची लस डाव्या हातावरच का दिली जाते; जाणून घ्या वैद्यकीय निरीक्षण https://www.navarashtra.com/featured-stories/why-is-the-corona-vaccine-given-only-on-the-left-hand-learn-medical-observation-nrvb-244833.html”]