
रविवारी पहाटे मेक्सिकोमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला होता. दक्षिण मेक्सिकोमध्ये ट्रक उलटून 10 जणांचा मृत्यू झाला होता. आता मेक्सिकोमध्ये पुन्हा एकदा मोठा रस्ता अपघात (Maxico Bus Accident) झाला आहे. मेक्सिकोमध्ये स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे बस उलटलून (Bus overturned) अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. अपघाताचं कारण अद्याप समजून शकलेलं नाही आहे. मृतांपैकी बहुतांश प्रवाशांचा समावेश आहे.
[read_also content=”कॅनडात भीषण विमान अपघात, दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिक ठार! दोघंही मुंबईचे रहिवासी https://www.navarashtra.com/world/two-indian-trainee-pilots-from-mumbai-killed-in-plane-crash-in-canada-nrps-466831.html”]
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओक्साका राज्याच्या ऍटर्नी जनरलने सांगितले की, सर्व मृत व्हेनेझुएला आणि हैतीचे रहिवासी आहेत. या अपघातात सुमारे 27 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, रविवारी पहाटे मेक्सिकोमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला. दक्षिण मेक्सिकोमध्ये ट्रक उलटून 10 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी सुमारे 25 जण जखमी झाले. मेक्सिकोच्या चियापास राज्यात ही दुर्घटना घडली. परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल मायग्रेशन इन्स्टिट्यूट (INM) ने या घटनेनंतर एक निवेदन जारी केले. INM ने एका निवेदनात म्हटले आहे की चियापासमधील पिझिजियापन-टोनला महामार्गावर अपघात झालेला ट्रक गुप्तपणे 27 क्यूबन नागरिकांना घेऊन जात होता. प्रथमदर्शनी अपघाताचे कारण जास्त वेगवान आहे. ट्रकचा वेग जास्त होता, यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. INM ने सांगितले की मृतांमध्ये एका अल्पवयीन महिलांसह एकूण 10 महिलांचा समावेश आहे.