Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ल्याने 49 जण आजारी तर एकाचा मृत्यू; प्रकरणाची चौकशी सुरू

अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे.मॅकडोनाल्ड या प्रसिद्ध फूड चेनचा बर्गर खाल्ल्याने अनेकजण आजारी पडले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 23, 2024 | 03:26 PM
अमेरिकेत मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ल्याने 49 जण आजारी तर एकाचा मृत्यू; प्रकणाची चौकशी सुरू

अमेरिकेत मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ल्याने 49 जण आजारी तर एकाचा मृत्यू; प्रकणाची चौकशी सुरू

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे.मॅकडोनाल्ड या प्रसिद्ध फूड चेनचा बर्गर खाल्ल्याने अनेकजण आजारी पडले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत ‘मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ल्याने E.coli बॅक्टेरियाचा संसर्ग पसरला आहे, ज्यामुळे 10 राज्यांमध्ये किमान 49 लोक आजारी पडले आहेत आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 संक्रमित लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये E.coli बॅक्टेरियाचा संसर्गाची प्रकरणे समोर

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने दिलेल्या माहितीनुसार, या संसर्गामुळे कोलोरॅडोमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच मूत्रपिंडाच्या गंभीर समस्येमुळे एका मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनांमध्ये 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान कोलोरॅडो, आयोवा, कॅन्सस, मिसूरी, मॉन्टाना, नेब्रास्का, ओरेगॉन, उटाह, वायोमिंग आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये संसर्गाच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

हे देखील वाचा- कझानमध्ये पंतप्रधान मोदी आणि मसूद पेझेश्कियान यांची द्विपक्षीय बैठक; ‘या’ मुद्यांवर करण्यात आली चर्चा

घटनेची चौकशी सुरू

कोलोरॅडोमध्ये सर्वाधिक 27 केसेस आढळल्या आहेत, तर नेब्रास्कामध्ये नऊ लोक बाधित झाले आहेत. CDC ने दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित लोकांनी मॅकडोनाल्डच्या ‘क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गर’चे सेवन केले होते, ज्यामुळे हा संसर्ग पसरल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेचे कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि राज्यांचे आरोग्य अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. या दूषिततेचे नेमके कारण अजूनपर्यंत निश्चित झालेले नाही, परंतु तपासकर्त्यांचे लक्ष गोमांस आणि कांद्याकडे आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला

संसर्ग टाळण्यासाठी मॅकडोनाल्डने प्रभावित राज्यांमधून चिरलेले कांदे आणि गोमांस पॅटीज हटवले आहेत. यामुळे या राज्यांमध्ये मॅकडोनाल्ड बर्गर काही काळासाठी अनुपलब्ध असेल. ई. कोलाय बॅक्टेरिया प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात आणि दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतात. हा संसर्ग ताप, पोटदुखी, आणि रक्तस्त्रावयुक्त अतिसार यांसारखे गंभीर परिणाम निर्माण करतो. या घटनेनंतर मॅकडोनाल्डच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून, मंगळवारी नऊ टक्के नुकसान नोंदवले गेले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून, संसर्ग होण्यापासून बचावासाठी अन्नाचे योग्यरित्या शिजवणे आणि स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सीडीसीच्या घोषणेनंतर मॅकडोनाल्डचे शेअर्स मंगळवारी नऊ टक्क्यांनी घसरले.

हे देखील वाचा- इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात मोठी कारवाई; कमांडरसह 9 दहशतवादी ठार

Web Title: 49 people sick and one died after eating mcdonalds burger in america nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 03:26 PM

Topics:  

  • America
  • McDonald

संबंधित बातम्या

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
1

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार
2

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!
4

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.