
Sudan Crisis
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (०५ डिसेंबर) रात्री उशिरा हा हल्ला झाला. यानंतर एक निवेदन जारी करण्यात आले होते. हल्ल्यानंतर एक वैद्यकीय पथक तिथे पोहोचले होते. यातील एका पथकाला देखील लक्ष्य करण्यात आले आहे. सध्या ड्रोन हल्ल्यांमुळे परिसरात संपूर्क तुटला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यापूर्वी गुरुवारी सकाळी देखील लष्कर आणि सुदानी सैन्यात संघर्ष सुरु झाला होता. दोन्ही लष्करी गटांमध्ये गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून हा संघर्ष सुरु आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान पुन्हा एकदा सुरु झालेल्या या संघर्षामुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या हल्ल्याचे मानवाधिकार संघटनांनी निषेध केला आहे. विशेष करुन महिला आणि मुलांवरील हल्ल्यांना मानवाधिकारे उल्लंघन मानले जात आहे. मानवाधिकार संघटना युनिसेफने आरएसएफ आणि सुदानी सैन्याला हल्ले थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच गरजूंना मानवतावादी मदत पोहोचवण्याची विनंती देखील केली आहे.
गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या या संघर्षात शेकडो नागरिक मारले गेले आहेत. RSF ने अल-फाशेर शहरावर ताबा केला आहे. यामुळे दारफुरमध्ये सुदानी सैन्याने हल्ला सुरु केला आहे. यापूर्वी दक्षिण कोर्डोफानमध्ये कौदा येथे सुदानी सैन्य आणि RSF मध्ये संघर्ष झाला होता. यावेळी ४८ लोक मारले गेले होते. सध्या अल-फाशेर शहरात भीतीचे वातावरण आहे. नागरी हत्याकांड, लैंगिक शोषण आणि गंभीर गुन्हे आतापर्यंत नोंदवले गेले आहे. यामुळे हजारो लोक सूदान सोडून पळून गेले आहेत.
२०२३ पासून RSF आणि सुदानी सैन्यात सत्तेसाठी संघर्ष सुरु आहे. जागितक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत संघर्षात ४० हजारांहून अधिक लोक मारले गेले आहे. तर १.२ कोटीहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. सध्या सुदानमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुदानमधील संघर्षावर चिंता व्यक्त केली जात आहे.
Sudan Crisis : सुदानमध्ये मृत्यूतांडव..! मृतदेहांचा साचला खच..; अंतराळातून टिपले भयावह दृश्य
Ans: सुदानच्या निमलष्करी दलाच्या सैनिकांनी (RSF) दक्षिण मध्य सुदानमध्ये कॉर्डोफान येथे ड्रोन हल्ला केला आहे.
Ans: सुदानमध्ये RSF आणि सुदानी सैन्यात झालेल्या संघर्षात 33 लहानमुलांसह ५० जणांचा मृत्यू झाला आहे?
Ans: सुदानमध्ये RSF आणि सुदानी सैन्यात 2023 पासून संघर्ष सुरु आहे.