
World War III
मीडिया रिपोर्टनुसार, इथिओपिया आणि इरिट्रियामध्ये युद्धाची ठिणगी उडाली आहे. इथिओपियाच्या मते, इरिट्रिया तिगेनच्या बंडखोरांना धोकादायक शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करत आहे. याचा वापर इथिओपियामध्ये हिंसाचार पसरवला जाण्याची शक्यात आहे. नुकतेच इथिओपियाच्या पोलिसांनी इरिट्रिलायने तिग्रे बंडखोरांना पुरवलेल्या दारुगोळ्याचा मोठा साठा जप्त केल्याचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर इथिओपियाने संतप्त होत सीमेवर लष्करी हालचाली वाढवल्या आहेत.
इथिओपियाच्या नॅशनल डिफेन्स फोर्सने तिग्रे भागाला वेढा घातला आहे. तसेच इरिट्रियाच्या सीमेजवळ तोफखाना आणि रणगाडे तैनात केले आहेत. तर दुसरीकडे इरिट्रियाने देखील इथिओपियाचे आरोप फेटाळत सीमांवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. यामुळे दोन्ही देशात युद्ध कधीही भडकू शकते अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
इथिओपिया आणि इरिट्रियामध्ये सुरु असलेला वाद काही नवीन नाही. यापूर्वी देखील दोन्ही देशांमध्ये तीव्र संघर्ष झाला आहे. १९९३ मध्ये इथिओपियापासून वेगळे झाल्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. १९९८-२००० दरम्यान झालेल्या दोन्ही देशांच्या वादात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच २०२० ते २०२२ दरम्यान इरिट्रियाच्या तिगेन सैन्याने इथिओपियावर हल्ला केला होता. यामध्ये सुमारे ६,००,००० लोक मारले गेले होते. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढत गेला.
आता दोन्ही देशातील तणाव पुन्हा उफाळला असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे मध्यपूर्वेत अमेरिका-इराणमधील तणाव वाढतच चालला आहे. तसेच रशिया युक्रेन युद्ध देखील अद्याप संपलेले नाही. यामुळे जगभरात अस्थिरतेचे वातावरण आहे.
Ans: इथिओपिया आणि इरिट्रियामध्ये सीमेवर सैन्य तैनाती सुरु असून युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
Ans: इथिओपियाच्या मते, इरिट्रिया तिगेनच्या बंडखोरांना धोकादायक शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करत आहे. याचा वापर इथिओपियामध्ये हिंसाचार पसरवला जाण्याची शक्यात आहे. यामुळे दोन्ही देशांत वाद पेटला आहे.
Ans: इथिओपियाचे आरोप फेटाळले असून सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवली आहे.