Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेत ट्रेनला धडकून 6 हत्तींचा मृत्यू; 2 जखमींवर उपचार सुरु

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी सकाळी एक दुर्घटना घडली. एका हत्तींच्या कळपाला धडकल्यानंतर एक ट्रेन रावरुन घसरली. या घटनेत सहा हत्तींचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 20, 2025 | 07:31 PM
6 elephants killed in Sri Lanka after train colliding with herd

6 elephants killed in Sri Lanka after train colliding with herd

Follow Us
Close
Follow Us:

कोलंबो: श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (20 फेब्रुवारी) सकाळी एक दुर्घटना घडली. एका हत्तींच्या कळपाला धडकल्यानंतर एक ट्रेन रुळावरुन घसरली. या घटनेत सहा हत्तींचा मृत्यू झाला असून ही घटना कोलंबोपासून 180 किमी अंतरावर असलेल्या हबरानाच्या वन्यजीव अभयारण्याजवळील रेल्वे रुळापाशी घडली. तथापि, या अपघातात को कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही. सध्या दोन हत्तींवर उपचार सुरु आहे.

पोलिस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, हत्तींच्या कळपाची ट्रेनशी टक्कर होणे काही नवीन घटना नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना श्रीलंकेत घडल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Hamas ceasefire: गाझा युद्धबंदीचा पहिला टप्पा पुर्ण; चार इस्त्रायली ओलिसांचे मृतदेह परत

Tragedy 😢🐘🚊🐘
The Batticaloa-Colombo train, ‘Meenagaya’, has collided with a herd of elephants at Gal Oya, resulting in the tragic death of 5 elephants.
The collision has caused the train to derail, obstructing services on the line, the Sri Lanka Railways says. pic.twitter.com/3lL7AKJzJE — Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) February 20, 2025


घटना कशी घडली? 

पोलिसांनी सांगितले की, हत्तींचा कळप रेल्वे मार्ग ओलांडत असताना हा अपघात घडला. रेल्वेच्या धडकेमुळे काही डब्बे रुळावरुन घसरले, मात्र, कोणताही जीवितहानी झाली नाही. सध्या अपघातात जखमी झालेल्या दोन हत्तींच्या उपचारासाठी वन्यजीव अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपघातानंतर एक हत्ती जखमी पिलाच्या बाजूला उभा राहून त्याला आधार देत असल्याचे भावनिक दृश्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत

श्रीलंकेत अशा घटना घडणे ही काही पहिलीच वेळी नाही. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्येही याच भागात एका गरोदर हत्तीणीसह दोन पिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. यामुळे, सरकारने रेल्वे चालकांना हत्तींच्या संचाराच्या भागात गतीमर्यादा पाळण्याचे आदेश दिले होते.

पूर्वीच्या घटना

2023 मध्ये देखील मानव-हत्ती संघर्षात 150 लोक णि 450 हत्ती मृत्यूमुखी पडले होते. याशिवाय, 2024 मध्ये 170 हून अधिक लोक तर, सुमारे 500 हत्ती मारले गेले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, दरवर्षी सुमारे 20 हत्ती रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडतात.

पर्यावरण मंत्र्यांची प्रतिक्रिया

या समस्येवर उपाय म्हणून पर्यावरण उपमंत्री अंतोन जयकोडी यांनी सांगितले की, सरकार अनेक उपाययोजना राबवणार आहे. गावांमध्ये हत्ती घुसू नयेत म्हणून इलेक्ट्रिक कुंपण, चर आणि इतर अडथळे उभारले जातील. त्यामुळे हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी होण्याची आशा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- US Arizona Plane Crash: अमेरिकेत विमान अपघाताची मालिका सुरुच; दोन विमानांची हवेत टक्कर

Web Title: 6 elephants killed in sri lanka after train colliding with herd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Shrilanka
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.