
A 5,500 kg golden Buddha statue
Golden Buddha Statue: बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. आज जगभरात असे अनेक देश आहेत जिथे बुद्धांच्या मोठ्या मूर्ती उभारल्या जातात आणि देव म्हणून त्यांची पूजा केली जाते. भारतातही अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात गौतम बुद्धांच्या मुर्तींचे अवशेष सापडले आहेत. भारतात सांची (मध्य प्रदेश): येथे १–३ शतकातले बौद्ध स्तूप व बुद्धाच्या विविध मूर्त्या आढळल्या आहेत.
उत्तरप्रदेशातील मथुरा येथे पहिल्या ते तिसऱ्या शतकातील बुद्धाचे शिल्प, खासकरून मथुरा शैलीतील लाल-संगमरवरी मूर्ती आढळून आल्या आहेत. खास बाब म्हणजे. सध्याच्या अफगाणिस्तानातील कंधारमध्येही पहिल्या ते पाचव्या शतकातल्या बुद्धाच्या शिल्पकला आढळून आल्या आहेत, इथेही ग्रीको-रोमन शैलीचा प्रभाव दिसतो.पण आज आपण गौतम बुद्धांच्या एका खास मूर्तीबद्दल बोलणार आहोत, या मूर्तीमुळे इतिहास, कला आणि अध्यात्माकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून टाकला आहे.
Sangali News: सांगलीतील इस्लामपूरचे नामांतर ‘ईश्वरपूर’ होणार; केंद्रसरकारचीही मंजूरी
गौतम बुद्धांची ही अपवादात्मक आणि भव्य मूर्ती सोन्यापासून बनलेली आहे, जी शेकडो वर्षांपासून माती आणि प्लास्टरच्या थराखाली गाडली गेली होती. या भव्य सोन्याच्या पुतळ्याची कहाणी त्याच्या तेजस्वी सोन्याइतकीच आकर्षक आहे.
थायलंडमधील बँकॉक शहरातील वाट ट्रायमिट येथे जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती “सुवर्ण बुद्ध” पाहायला मिळते. ही मूर्ती सुमारे ३ मीटर उंच असून, वजन अंदाजे ५,५०० किलोग्रॅम (१२,१२५ पौंड) आहे.
या मूर्तीचे सर्वात खास वैशिष्ट्य अगदी बुद्धाच्या केसांच्या वरच्या गाठीपासून पायापर्यंत पूर्ण मूर्ती सोन्याने बनवलेली आहे. बांधकामासाठी सुमारे ८३ टक्के शुद्ध सोने वापरण्यात आले आहे. मूर्तीतल्या विविध भागांमध्ये सोन्याची शुद्धता वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, बुद्धाचे शरीर अंदाजे ४० टक्के शुद्ध सोन्याचे असून, केस आणि वरच्या गाठीचे भाग अंदाजे ९९ टक्के शुद्ध सोन्याने बनवलेले आहेत.
Vastu Tips: चुकीच्या दिशेने ठेवलेला इन्व्हर्टर मुलांना बनवू शकतो कमकुवत, कोणती दिशा योग्य जाणून घ्या
सोन्याच्या सध्याच्या किमतीनुसार सुवर्ण बुद्धाची किंमत $४८० दशलक्ष पेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. शिवाय, सुवर्ण बुद्धाच्या पुतळ्याची रचना विशिष्ट बौद्ध परंपरेचे प्रतिबिंबित करते, ज्यामध्ये बुद्ध भूमिस्पर्श मुद्रेत (बसलेल्या मुद्रा) बसलेले आहेत. हे मुद्रा ज्ञान, वासना आणि अज्ञानावर विजयाचे प्रतीक आहे.
ही अद्वितीय सुवर्ण बुद्ध मूर्ती जवळजवळ २०० वर्षांपासून प्लास्टर आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली होती होती. मुर्तीची सोन्याची ओळख लपविण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य आक्रमण आणि चोरीपासून संरक्षण करण्यासाठी ही मूर्ती प्लास्टर आणि रंगीत काचेच्या जाड थराने झाकली गेली होती.