सांगलीतील इस्लामपूरचे नामांतर 'ईश्वरपूर' होणार; केंद्रसरकारचीही मंजूरी
Sangali News: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ असे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या १३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रानुसार, सर्व्हे ऑफ इंडिया (एसएसआय) ने या नाव बदलाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
इस्लामपूर नगर परिषदेने ४ जून २०२५ रोजी ठराव क्रमांक ८२५ अंतर्गत शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावाला सांगलीचे वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता, मिरज यांनीही पाठिंबा देणारे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी केले.
देव तारी त्याला…! दुचाकीवरून महिला पडली; मागून कार येत असतानाच अचानक ब्रेक दाबला अन्…
इस्लामपूर नगर परिषदेने ४ जून २०२५ रोजी ठराव क्रमांक ८२५ अंतर्गत शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावाला सांगलीचे वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता, मिरज यांनीही पाठिंबा देणारे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी केले.
विभागाच्या मते, प्रस्तावित नाव बदल सर्व वैध प्रशासकीय प्रक्रियांचे पालन करतो. नवीन नाव “ईश्वरपूर” देवनागरी आणि रोमन लिपींमध्ये निश्चित केले गेले असून, भारतीय लिपीतील ध्वनी अचूकपणे प्रतिबिंबित करण्यासाठी डायक्रिटिक्स वापरून लिप्यंतरित करण्यात आले आहे. नाव बदलाबाबत राजपत्र अधिसूचना जारी झाल्यानंतर त्याची प्रत देहरादून येथील मुख्य कार्यालय आणि पुण्यातील महाराष्ट्र व गोवा भू-स्थानिक संचालनालयाला पाठवावी, अशी सूचना भारतीय सर्वेक्षण संस्थेने दिली आहे.
सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील हा निर्णय सांस्कृतिक ओळखीचा आदर करण्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की हा बदल प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि पारंपारिक ओळखीचा आदर करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेचे अधीक्षक सर्वेक्षक तुषार वैश यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून राजपत्र अधिसूचना लवकर जारी करण्याची विनंती केली आहे. यासंबंधीची माहिती गृह मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण महासंचालक कार्यालय, पश्चिम प्रदेश, जयपूर आणि पुणे संचालनालयालाही पाठवण्यात आली आहे.
मंत्री नितेश राणे काय म्हणाले?
इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्यचा निर्णय घेतल्यानंतर, राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. “महाराष्ट्राचे इस्लामपूर आता ईश्वरपूर झाले आहे. केंद्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर असे करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे इस्लामपूर आता ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल.”
“पूर्वी, ईश्वरपूरचे नाव बदलण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यापक जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. एक हिंदू म्हणून मीही या मोर्चात सहभागी झालो होतो. त्या मोर्चामुळे आज इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर असे ठेवण्यात आले आहे. ही सांगली आणि संपूर्ण राज्यातील लोकांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नाही तर हिंदू संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आहे. हिंदू ओळख जपण्याच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र आणि राज्य सरकारांचे मनापासून आभार मानतो.”






