
France first Hindu temple
मिळालेल्या माहितीनुसार, पॅरीसजवळील बुसी-सेंट-जॉर्जेस येथे हिंदू मंदिर उभारले जाणार असून भारतातील शिल्पकारांनी कोरलेले दगड फ्रान्सला पाठवण्यात आले आहे. या दगडांचे काल सोमवारी शिलापूजन करण्यात आले आहे. हे दगड भारतातील पारंपारिक स्थापत्यकलेचे वारशाचे प्रतीक आहेत. फ्रान्समधील मंदिर हे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेशी (BAPS) संंबंधित आहे. या नव्या पर्वामुळे हा भारत आणि फ्रान्सच्या सांस्कृतिक मैत्रीचा आणि सहकार्याचा उत्सव मानला जात आहे.
या मंदिराच्या बांधकामासाठी भारताचे कुशल कारागिरी आणि फ्रेंचचे कुशल कारागिर एकत्र मिळून काम करणार आहेत. यामुळे भारतीय कोरीव कामाची सूक्ष्मता आणि फ्रान्सच्या कौशल्यपूर्ण दगडी बांधकमातील अचूकतेचे हे मंदिर प्रतीक असणार आहे. हे मंदिर भारत आणि फ्रान्सच्या सांस्कृतिक मूल्ये आणि ज्ञानाचे एकत्रीकरणाचे एक प्रतीक आहे. मंदिराची रचना ही केवळ पुजेसाठीच नाही तर संस्कृती, शिक्षण आणि सामुदायिक सहभागासाठी तयार करण्यात आली आहे. हे भारत आणि फ्रान्समधील मैत्रीचे प्रतीक मानले जाईल.
La tradition indienne arrive en France dans un élan de profond respect et de buts partagés.
Le grès sculpté, façonné par des maîtres artisans en Inde, arrive en France pour former le premier temple hindou traditionnel, fruit de la rencontre entre patrimoine, savoir-faire… pic.twitter.com/Pq5drga2MJ — BAPS Mandir Swaminarayan Hindou de Paris (@BAPSParis) January 25, 2026
भारत-फ्रान्समधील या ऐतिहासिक प्रसंगी भारताचे राजदूत, फ्रेंच सरकारचे प्रतिनीध, धार्मिक सल्लागार आणि विवध समुदायांचे नेते देखील उपस्थित होते. या प्रकल्पाला मानवी सहकार्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या मंदिरामुळे भविष्यात दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील. तसेच भारताचा सांस्कृतिक वारसा देखील आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Ans: फ्रान्सची राजधानी पॅरीसजवळील बुसी-सेंट-जॉर्जेस येथे हिंदू मंदिर उभारले जाणार आहे.
Ans: फ्रान्समध्ये हिंदू मंदीराच्या बांधकामामुळे भारतासोबतचे त्याचे सांस्कृतिक संबंध, परस्पर सन्मान, आणि मैत्री अधिक दृढ होईल.
Ans: फ्रान्समधील मंदिर हे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेशी संंबंधित आहे.