सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. हॅाटेल, प्रेक्षणिय स्थळांचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. असे व्हिडिओ अल्पावधीत व्हायरल होतात. सध्या असाच एक विदेशातील हॅाटेलमधला व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात एक मुलगी दिसत आहे. या मुलीसमोर भारतीय पद्धतीच जेवण येताच तीचा आंनद गगनात मावेनासा होत आहे. हा व्हिडिओ पाहून तिचं भारतीय जेवणावरचं (Indian Food) प्रेम दिसून येत आहे.
या व्हिडिओतील मुलीचं वय सुमारे 5-6 वर्षे असून ती दिव्यांग भारतीय मुलगी आहे, जिला काही काळापूर्वी एका अमेरिकन कुटुंबाने दत्तक घेतले आहे. मुलीला अमेरिकेत नेल्यानंतर तिच्या दत्तक पालकांनी तिला तिच्या आवडीचे पदार्थ खाण्यासाठी मिळावे यासाठी तिला भारतीय रेस्टॉरंटमध्ये नेले. मुलगी भारतीय असल्यामुळे बहुधा तिला भारतीय पदार्थ आवडतात. मात्र, अमेरिकेत राहात असल्यामुळे तिला भारतीय खाद्यपदार्थ खाण्यास नाही मिळत असं दिसत आहे. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये टेबलवर भारतीय पदार्थ येताच मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती उठते आणि उभी राहते आणि खाण्यासाठी वाटही बघू शकत नाही आहे.
या चिमुकलीच्या पालकांनी सांगितलं की, “आम्ही आमच्या मुलीला भारतातून दत्तक घेतले आहे. आम्ही घरी भारतीय जेवण बनवतो पण नुकतेच आम्ही तिला अमेरिकेतील भारतीय रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो. तिने कित्तेक दिवसापासून भारतापासून थाळी पाहिली नव्हती आणि त्यामुळे तिच्यासमोर भारतीय जेवण आल्यावर ती खूप उत्साहित झाली. तिला ऐकू येत नाही पण ती फार उत्साही आहे.
मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू तिला संसाराचा आनंद मिळाला आहे. हा व्हिडिओ लॅडबिबल या परदेशी वेबसाइटने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोन वेण्या बनवलेली मुलगी आनंदाने उड्या मारत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर खूप कमेंट्स केल्या. एका युजरने लिहिले – धन्यवाद दत्तक घेतल्यानंतरही भारतीय खाद्यपदार्थ लक्षात राहतात. भारतीय जेवण अप्रतिम आहे यात शंका नाही. दुसर्याने लिहिले की, कधी कधी संपत्तीपेक्षा अशा छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. भारतीय अन्न ही एक भावना आहे.