Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स

timelapse : शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून घेतलेला भारताचा टाइमलॅप्स फोटो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हिमालय आणि देशाचा पूर्व किनारा दिसत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2025 | 11:49 AM
A magical timelapse of India captured by Shubanshu Shukla from the ISS

A magical timelapse of India captured by Shubanshu Shukla from the ISS

Follow Us
Close
Follow Us:

Timelapse Video : भारताच्या अंतराळ इतिहासात नवा अभिमानास्पद अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि चाचणी वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) भारताचा एक अनोखा टाइमलॅप्स व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओतून दिसणारा भारत प्रेक्षकांना एखाद्या “खिडकीतून पृथ्वीला पाहण्याचा” अद्भुत अनुभव देतो.

भारताचे अंतराळातील रूप

शुक्ला यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये भारताचे पूर्व किनारे, हिमालयाचा भव्य पट्टा आणि देशभर घोंघावणाऱ्या वादळांचे अप्रतिम दृश्य टिपले आहे.

  • व्हिडिओमध्ये हिमालयावर विजा कोसळतानाचा क्षण पाहणाऱ्यांना थक्क करतो.

  • पावसाळ्यातील ढगाळ हवामानामुळे भारताचे काही भाग धूसर दिसतात, मात्र जे दिसते ते स्वप्नवत भासते.

शुक्ला यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, “हा टाइमलॅप्स पाहताना प्रेक्षकांना असे वाटावे की ते आयएसएसच्या खिडकीत बसले आहेत.” त्यांनी हा व्हिडिओ लँडस्केप मोडमध्ये आणि उच्च स्क्रीन ब्राइटनेससह पाहण्याचा सल्लाही दिला आहे.

*- Watch the video in landscape with screen brightness high.

While on orbit I tried to capture pictures and videos so that I can share this journey with you all.

This is a Timelapse video of Bharat from space. The @iss is moving from south to north from the Indian Ocean. We are… pic.twitter.com/ETEARm88tz

— Shubhanshu Shukla (@gagan_shux) August 22, 2025

credit : social media

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचा अभिमान

३९ वर्षीय शुभांशू शुक्ला हे अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग म्हणून अंतराळात पोहोचले.

  • ही मोहीम अमेरिकन कंपनी Axiom Space ने नासा आणि इस्रोच्या सहकार्याने आयोजित केली.

  • यामुळे १९८४ मध्ये राकेश शर्मा यांच्या उड्डाणानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे ते पहिले भारतीय ठरले.

  • एकूण पाहता, अंतराळात जाणारे ते भारताचे फक्त दुसरेच नागरिक ठरले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा

 शुक्लांची कहाणी

शुक्ला यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनऊ येथे झाला. त्यांचे कुटुंब साधारण मध्यमवर्गीय असून विमानचालन किंवा अंतराळ क्षेत्राशी त्यांचा थेट संबंध नव्हता. पण बालपणी पाहिलेल्या एअरशोमुळे त्यांच्या मनात उड्डाणाची आणि अंतराळाची गोडी निर्माण झाली.

  • भारतीय हवाई दलात प्रवेश घेतल्यानंतर ते एक यशस्वी चाचणी वैमानिक म्हणून नावारूपाला आले.

  • पुढे त्यांची निवड अ‍ॅक्सिओम मोहिमेसाठी झाली आणि अखेर २५ जून २०२५ रोजी त्यांनी आपला पहिला अंतराळ प्रवास पूर्ण केला.

 “ही एक अद्भुत सवारी होती”

शुक्ला स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेट आणि क्रू ड्रॅगन यानातून अंतराळात गेले. प्रक्षेपणानंतर अवघ्या दहा मिनिटांत कॅप्सूल कक्षेत प्रवेश करताच शुक्ला हिंदीत म्हणाले  “यह एक अद्भुत यात्रा थी!” हा क्षण ऐकताच भारतीयांना पुन्हा एकदा १९८४ मधील राकेश शर्मा यांची आठवण झाली.

 अंतराळातले १८ दिवस

शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर तब्बल १८ दिवसांचा मुक्काम केला.

  • त्यांनी वैज्ञानिक प्रयोगांपासून ते अंतराळातून भारताचे निरीक्षण अशा विविध कार्यात भाग घेतला.

  • शेवटी १५ जुलै रोजी, अ‍ॅक्सिओम-४ चा क्रू ड्रॅगन पॅसिफिक महासागरात उतरला आणि मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Xi Jinping Tibet visit : राजकीय स्थिरतेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे प्रगतीशील पाऊल; तिबेट वारीमागे नेमके कारण काय?

 भारताचा नवा अभिमान

१९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी “सारे जग से अच्छा” असे उद्गार काढून भारतीयांना भावूक केले होते. ४० वर्षांनंतर शुभांशू शुक्ला यांच्या या प्रवासाने पुन्हा एकदा देशवासीयांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणले. त्यांच्या व्हिडिओमुळे जगाला “असा भारत जो तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल” हे खरे वाटते.

Web Title: A magical timelapse of india captured by shubanshu shukla from the iss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • ISRO
  • shubhanshu shukla
  • Space News

संबंधित बातम्या

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा
1

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा

‘हे माझे नाही, तर संपूर्ण देशाचे मिशन’, ISS मधून परतल्यावर Shubhanshu Shukla यांनी सांगिला अनुभव
2

‘हे माझे नाही, तर संपूर्ण देशाचे मिशन’, ISS मधून परतल्यावर Shubhanshu Shukla यांनी सांगिला अनुभव

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती
3

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न
4

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.