• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • 38 Year Old Sergio Gore Is The New Us Ambassador To India

Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा

Trump nominating Sergio Gor : डोनाल्ड ट्रम्प यांनी ३८ वर्षीय सर्जियो गोर यांची भारतातील राजदूत आणि दक्षिण-मध्य आशियासाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2025 | 10:43 AM
38-year-old Sergio Gore is the new US ambassador to India

Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे 'राजदूत' पदाची धुरा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

US Ambassador To India : भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा सध्याचा टप्पा अत्यंत गुंतागुंतीचा मानला जात आहे. अशा वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३८ वर्षीय सर्जियो गोर यांना भारतातील पुढील राजदूत तसेच दक्षिण-मध्य आशियासाठी विशेष दूत म्हणून नियुक्त केल्याने आंतरराष्ट्रीय पटलावर नवी चर्चा रंगली आहे.

आव्हानात्मक काळातील नियुक्ती

अमेरिका-भारत संबंध मागील काही वर्षांत विविध तणावांनी व्यापले आहेत. व्यापार धोरणे, भू-राजकीय संघर्ष, पुरवठा साखळी सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मतभेद या सर्वांचा परिणाम द्विपक्षीय संबंधांवर होत आहे. अशा वेळी सर्जियो गोर यांची नियुक्ती हे वॉशिंग्टनकडून दिलेले स्पष्ट संकेत आहेत नवी दिल्लीसोबत संवादाची नवी गती सुरू करणे हेच उद्दिष्ट आहे. व्हाईट हाऊस या निर्णयाकडे विश्वास पुनर्संचयित करण्याचा आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याचा प्रयत्न म्हणून पाहत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा

ट्रम्प यांचा विश्वास जिंकलेला चेहरा

सर्जियो गोर यांची राजकीय कारकीर्द ही पूर्णपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासावर आधारित आहे. रूढीवादी विचारसरणीशी घट्ट नाते ठेवणारे गोर हे ट्रम्प यांच्या सर्वात जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचा कार्यशैलीतील काटेकोरपणा आणि प्रशासनातील कार्यक्षमता यामुळे व्हाईट हाऊसच्या अंतर्गत वर्तुळात त्यांचे महत्त्व वाढत गेले.

गोर यांची पहिली प्रतिक्रिया

भारतासाठी राजदूत म्हणून आपले नाव जाहीर झाल्यानंतर सर्जियो गोर यांनी कृतज्ञता व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिले :
“डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील पुढील अमेरिकन राजदूत आणि दक्षिण-मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूत म्हणून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. अमेरिकन जनतेची सेवा करण्यापेक्षा मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अधिक अभिमान वाटलेला नाही. आमच्या व्हाईट हाऊसने अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यात ऐतिहासिक यश मिळवले आहे. अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असेल!”

मार्को रुबियो यांची प्रतिक्रिया

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही या नियुक्तीचं स्वागत केलं. त्यांनी ट्विट करत म्हटलं  “भारतातील आमचे पुढील राजदूत म्हणून सर्जियो गोर यांना नामांकित करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय अत्यंत योग्य आहे. ते अमेरिकेचे एक उत्कृष्ट प्रतिनिधी ठरतील आणि जगातील आमच्या सर्वात महत्त्वाच्या संबंधांना अधिक बळकटी देतील.”

I am excited about the Presidents decisions to nominate @SergioGor to be our next Ambassador to India. He will be an excellent representative of America in one of the most important relationships our nation has in the world. — Marco Rubio (@marcorubio) August 22, 2025

credit : social media

सर्जियो गोर कोण आहेत?

  • जन्म व बालपण : गोर यांचा जन्म ताश्कंद येथे झाला. त्यांचे मूळ नाव सर्जियो गोरोचोव्स्की असून, लहानपणापासून ते विविध संस्कृतींमध्ये वाढले. काही वर्षे त्यांनी भूमध्यसागरातील माल्टा बेटावरही वास्तव्य केले.
  • शिक्षण : कॅलिफोर्नियामध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेतूनच ते रूढीवादी राजकारणात सक्रिय होते.
  • धार्मिक ओळख : गोर स्वतःला कॅथोलिक म्हणून ओळखतात.
  • ट्रम्पशी संबंध : २०२१ मध्ये गोर यांनी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरसोबत Winning Team Publishing ची स्थापना केली. त्यामुळे त्यांना ट्रम्प कुटुंबाच्या सर्वांत जवळच्या सहकाऱ्यांमध्ये स्थान मिळाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India China Alliance : आता चीननेही भारताच्या हितासाठी जागतिक मंचावर उचलला मोठा झेंडा, 50% करावर थेट विरोध

ट्रम्पच्या विश्वासावर आधारित कारकीर्द

गोर यांची प्रशासकीय कौशल्ये आणि राष्ट्राध्यक्षांच्या प्राधान्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची क्षमता यामुळे त्यांना व्हाईट हाऊसने विशेष जबाबदाऱ्या दिल्या. त्यांनी विविध धोरणात्मक उपक्रमांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतासारख्या जागतिक शक्तीसमोर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करण्याची ही संधी गोर यांच्यासाठी एक मोठं पाऊल मानली जात आहे.

भारत आणि अमेरिका

भारत आणि अमेरिका हे आज जगातील दोन सर्वात महत्त्वाचे लोकशाही देश आहेत. या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध कधीकधी कठीण टप्प्यावर पोहोचले तरी संवाद, विश्वास आणि सहकार्य हेच त्यांचे मूळ अधिष्ठान आहे. सर्जियो गोर यांची नियुक्ती ही त्याचाच एक नवा अध्याय ठरणार आहे. आता प्रश्न असा आहे की या तरुण, ऊर्जावान आणि ट्रम्प यांच्या विश्वासास पात्र असलेल्या चेहऱ्यामुळे भारत-अमेरिका संबंधांना नवी दिशा मिळेल का?

Web Title: 38 year old sergio gore is the new us ambassador to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • india

संबंधित बातम्या

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण
1

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

Canada Bill C-3 : आनंदाची बातमी! भारतीयांसाठी कॅनडात नागरिकत्वाचा मार्ग खुला; कॅनडियन संसदेत विधेयक C-3 मंजूर
2

Canada Bill C-3 : आनंदाची बातमी! भारतीयांसाठी कॅनडात नागरिकत्वाचा मार्ग खुला; कॅनडियन संसदेत विधेयक C-3 मंजूर

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती
3

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती

केंद्राकडून अनेक गुणवत्ता मानके शिथिल! देशातील लहान उद्योगांना होईल फायदा, तर मोठ्या उद्योगांच्या वाढतील अडचणी
4

केंद्राकडून अनेक गुणवत्ता मानके शिथिल! देशातील लहान उद्योगांना होईल फायदा, तर मोठ्या उद्योगांच्या वाढतील अडचणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी; कालमर्यादा नाही पण विलंब नको

राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी; कालमर्यादा नाही पण विलंब नको

Nov 25, 2025 | 01:15 AM
पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

Nov 25, 2025 | 12:30 AM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM
Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Nov 24, 2025 | 11:17 PM
घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! Home Loan वर ४% व्याजात सबसिडी; जाणून घ्या योजनेचा फायदा कोणाला?

घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! Home Loan वर ४% व्याजात सबसिडी; जाणून घ्या योजनेचा फायदा कोणाला?

Nov 24, 2025 | 10:05 PM
Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार

Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार

Nov 24, 2025 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Nov 24, 2025 | 07:12 PM
Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Nov 24, 2025 | 07:02 PM
Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Nov 24, 2025 | 06:53 PM
Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Nov 24, 2025 | 06:46 PM
Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Nov 24, 2025 | 03:11 PM
Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Nov 24, 2025 | 03:07 PM
Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Nov 23, 2025 | 06:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.