Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Plane Crash : आकाशात मृत्यूचा थरार! दोन विमानांची समोरासमोर भीषण टक्कर; झुडुपांमध्ये आढळला पायलटचा मृतदेह

Wedderburn mid-air crash : न्यू साउथ वेल्स राज्य पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर सिडनीच्या नैऋत्य उपनगरातील वेडरबर्न येथील विमानतळाजवळील झुडुपात बचावकर्त्यांना पायलटचा मृतदेह आढळला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 30, 2025 | 03:17 PM
A pilot died after two light planes collided mid-air near Sydney

A pilot died after two light planes collided mid-air near Sydney

Follow Us
Follow Us:
  1. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स प्रांतात हवेतच दोन हलक्या विमानांची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला असून त्यात एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.
  2. धडकेनंतर एक विमान सिडनीच्या नैऋत्य उपनगरातील वेडरबर्न येथील विमानतळाजवळील झुडुपांमध्ये कोसळले, तर दुसऱ्या विमानाचा वैमानिक प्रसंगावधान राखत सुरक्षित लँडिंग करण्यात यशस्वी ठरला.
  3. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, हवाई वाहतूक तपास यंत्रणा आणि न्यू साउथ वेल्स पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
Wedderburn mid-air crash : ऑस्ट्रेलियातील ( Australia) न्यू साउथ वेल्स प्रांतात रविवारी सकाळी घडलेल्या एका भीषण विमान अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. सिडनी शहराच्या बाहेरील भागात दोन हलकी विमाने हवेतच समोरासमोर आदळली आणि यात एका वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला. आकाशात रस्त्यावरील अपघातासारखी धडक होऊन विमान जमिनीवर कोसळल्याचे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांमध्ये आणि विमानतळ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य सिडनीपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या वेडरबर्न या भागाजवळ हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यापैकी एक विमान थेट झुडुपांमध्ये कोसळले. ज्या विमानाचा अपघात झाला, त्यामध्ये एकमेव वैमानिक होता आणि त्याचाच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि झुडुपांमध्ये अडकलेल्या विमानाच्या ढिगाऱ्यांमधून वैमानिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shadow Fleet : ‘हा VIRATआहे, आम्हाला मदत हवी आहे, मेडे…मेडे’; रशिया युक्रेनचा ब्लॅक सीमध्ये युद्ध थरार, तुर्की मात्र अनभिज्ञ

या दुर्घटनेत दुसऱ्या विमानाचा वैमानिक मात्र चमत्कारिकरीत्या बचावला. हवेत धडक झाल्यानंतरही त्याने परिस्थितीचा अंदाज घेत विमानावर नियंत्रण राखले आणि जवळच्या एअरफील्डवर सुरक्षितपणे लँडिंग करण्यात यश मिळवले. या वैमानिकाला कोणतीही गंभीर इजा झालेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही बाब थोड्याफार दिलासा देणारी असली तरी, आकाशातील या अपघाताने विमान सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Two light aircraft collided mid-air during formation flying near Wedderburn aerodrome south of Sydney, killing one pilot while the other landed safely. pic.twitter.com/qzV0LCLcvt — 7NEWS Sydney (@7NewsSydney) November 30, 2025

credit : social media

न्यू साउथ वेल्स पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तांत्रिक बिघाड, मानवी चूक की हवामानातील अडथळे, यापैकी कोणत्या कारणामुळे ही धडक झाली, याचा शोध घेण्यासाठी हवाई वाहतूक तपास यंत्रणा (एव्हिएशन सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन टीम) तपास करत आहे. घटनास्थळाची पाहणी, विमानांचे अवशेष गोळा करणे आणि दुसऱ्या वैमानिकाचा जबाब नोंदवणे अशा विविध पद्धतींनी चौकशी सुरु आहे.

स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, अचानक आकाशात मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच एक विमान खाली कोसळताना दिसले. आकाशात धूराचे लोट आणि जमिनीवर पेटलेल्या झुडुपांमुळे ते दृश्य अधिकच भयावह झाले होते. या अपघातामुळे काही वेळासाठी त्या परिसरातील वाहतूकही थांबवण्यात आली होती. आपत्कालीन सेवा, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Stockton : कॅलिफोर्नियामध्ये मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, 19 जखमी, धक्कादायक VIDEO VIRAL

हा अपघात ऑस्ट्रेलियाच्या विमानचालन इतिहासातील आणखी एक धक्कादायक घटना म्हणून नोंदवला जात आहे. वाढती हवाई वाहतूक आणि प्रशिक्षण विमानांची संख्या लक्षात घेता, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर नियम आणि सुरक्षा उपाय लागू करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. अंतिम तपास अहवालानंतरच या अपघातामागील खरे कारण समोर येणार असून, त्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे झाला?

    Ans: सिडनीच्या नैऋत्येकडील वेडरबर्नजवळ, न्यू साउथ वेल्स प्रांतात.

  • Que: या अपघातात किती नुकसान झाले?

    Ans: एका वैमानिकाचा मृत्यू झाला असून एक विमान पूर्णपणे कोसळले.

  • Que: अपघाताचे कारण काय आहे?

    Ans: अद्याप अस्पष्ट असून हवाई सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरू आहे.

Web Title: A pilot died after two light planes collided mid air near sydney

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Australia
  • international news
  • Plane Accident

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
4

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.