Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK Navy : ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करत आहात’, रशियामुळे ब्रिटनची सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर; Frigate,P-8 Poseidon तैनात

Russian intelligence ship Yantar : ब्रिटनच्या सीमेवर रशियन गुप्तचर जहाज पोहोचल्याने युरोपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ब्रिटनने रशियाला इशारा देत म्हटले आहे की, 'तुम्ही काय करत आहात हे आम्हाला माहिती आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 20, 2025 | 08:40 AM
A Russian spy ship neared Britain prompting the UK to send a frigate and surveillance vessel

A Russian spy ship neared Britain prompting the UK to send a frigate and surveillance vessel

Follow Us
Close
Follow Us:
  1. रशियन गुप्तचर जहाज Yantar ब्रिटनच्या पाण्यात घुसल्याचा आरोप; RAF पायलटवर लेसर डागल्याचेही दावे.
  2. ब्रिटनने फ्रिगेट, P-8 Poseidon विमान तैनात करून यंतारवर सतत नजर ठेवली.
  3. ब्रिटनचे संरक्षणमंत्री जॉन हेली यांचा पुतिनला कडक इशारा ‘तुम्ही काय करत आहात आम्हाला स्पष्ट दिसत आहे.

Russian intelligence ship Yantar : युरोपमध्ये वाढत्या भू-राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन (Britain) आणि रशियामधील(Russia) समुद्री संघर्षाचे सावट पुन्हा एकदा गडद झाले आहे. ब्रिटनच्या उत्तरेकडील पाण्यात रशियाचे प्रगत गुप्तचर जहाज Yantar दिसल्याने लंडनमध्ये सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली. ब्रिटिश संरक्षण विभागाने तातडीची हालचाल करत फ्रिगेट व P-8 Poseidon विमान तैनात करून या जहाजावर चौफेर नजर ठेवली. या घडामोडींना आणखी संवेदनशील बनवणारी बाब म्हणजे, ब्रिटनने केलेला गंभीर आरोप रशियन जहाजाने RAF च्या पायलटवर लेसर डागल्याचा दावा. यामुळे परिस्थिति अधिक तणावपूर्ण बनली असून ब्रिटनने याला “धोकादायक उकसावणी” असे संबोधले आहे.

पुतिनला ब्रिटनचा थेट इशारा

लंडनमध्ये दिलेल्या भाषणात ब्रिटनचे संरक्षण सचिव जॉन हेली यांनी या प्रकरणावर अत्यंत कठोर भूमिका घेतली. त्यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना थेट उद्देशून म्हटले,

“आम्ही तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहोत. तुमचे जहाज येथे काय करत आहे, हे आम्हाला स्पष्टपणे माहिती आहे.”

हेली यांनी सांगितले की Yantar हे जहाज गेले काही दिवस ब्रिटिश समुद्री हद्दीत आढळले असून ते देशाच्या महत्त्वाच्या सागरी पायाभूत सुविधेसाठी संभाव्य धोका मानला जात आहे. आरएएफचे वैमानिक या जहाजाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवीत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO: एका रात्रीत 476 हल्ले! ड्रोन–मिसाईल महाआक्रमणामुळे टेर्नोपिल हादरले; 25 जण ठार, 19 जण जिवंत जाळले

ब्रिटनची तातडीची संरक्षण हालचाल

स्थितीचा अंदाज घेत ब्रिटिश नौदलाने रॉयल नेव्हीचे फ्रिगेट आणि सुयोग्य सागरी निरीक्षणासाठी अत्याधुनिक P-8 Poseidon विमान तैनात केले.
हेली यांच्या मते, Yantar ने केलेले लेसर अटॅक “धोकादायक आणि आंतरराष्ट्रीय समुद्री नियमांचे उल्लंघन करणारे” आहे. हे जहाज यावर्षी दुसऱ्यांदा ब्रिटिश पाण्यात दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रिटनने स्पष्ट संदेश दिला की पुढील कोणतीही उकसावणी सहन केली जाणार नाही.

British military release a photo of a Royal Navy Frigate closely shadowing the Russian spy ship which directed layers at military personnel yesterday. I say sink it. pic.twitter.com/z2jL75hRvR — WarMonitor🇺🇦🇬🇧 (@WarMonitor3) November 19, 2025

credit : social media

जगभरातील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली

जॉन हेली यांनी त्यांच्या भाषणात केवळ रशियाच नव्हे तर जगातील इतर संघर्षांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की:

  • इस्रायल–इराण तणावामुळे पश्चिम आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर आहे,
  • भारत-पाकिस्तानमध्ये सशस्त्र संघर्षाच्या बातम्या चिंताजनक आहेत,
  • चीनकडून पाश्चिमात्य लोकशाहींवर गुप्तहेर कारवाया सुरू आहेत,
  • आणि पुतिन यांनी युक्रेनमधील युद्ध आणखी तीव्र केले आहे.

त्याचबरोबर गेल्या वर्षभरात नाटोच्या हवाई क्षेत्रात रशियन घुसखोरी दुपटीने वाढल्याचा उल्लेखही त्यांनी केला. फक्त ब्रिटनवर 90,000 पेक्षा जास्त सायबर हल्ले झाल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान

ब्रिटन ‘युद्ध तयारी’ गतीमान करणार

वाढत्या धोक्यांचा विचार करून ब्रिटन सरकारने देशात 13 ठिकाणी अत्याधुनिक युद्धसामग्री तयार करणारे “Future Factories” उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी दोन नवीन ड्रोन उत्पादन कारखाने या आठवड्यात सुरू होणार आहेत, ज्यामुळे संरक्षण क्षेत्रातील ब्रिटनचे नेतृत्व अधिक मजबूत होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले.

हेली यांनी म्हटले,

“धोक्याचे एक नवीन युग सुरू झाले आहे. यासाठी अधिक मजबूत संरक्षण, सक्षम मित्रदेश आणि जलद राजनयिक पावले आवश्यक आहेत.”

रशियन जहाजामुळे निर्माण झालेल्या ताज्या तणावाने युरोपमधील समुद्री सुरक्षा आणि जागतिक सामरिक समतोल पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आणला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियन Yantar जहाजावर ब्रिटन का सतर्क झाले?

    Ans: कारण हे जहाज ब्रिटनच्या पाण्यात घुसल्याचा आणि राष्ट्रीय सागरी पायाभूत सुविधांना धोका निर्माण केल्याचा आरोप आहे.

  • Que: ब्रिटनने कोणती कारवाई केली?

    Ans: रॉयल नेव्हीचे फ्रिगेट आणि RAF चे P-8 Poseidon विमान तैनात करून जहाजावर सतत नजर ठेवली.

  • Que: लेसर हल्ल्याचा आरोप काय आहे?

    Ans: ब्रिटनचा दावा आहे की Yantar ने RAF च्या पायलटवर लेसर डागले, जे अत्यंत धोकादायक आहे.

Web Title: A russian spy ship neared britain prompting the uk to send a frigate and surveillance vessel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • britain
  • International Political news
  • Russia
  • ship

संबंधित बातम्या

Powerful leaders Death penalty: सद्दामपासून शेख हसीनांपर्यंत…; जगातील अनेक शक्तिशाली नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा
1

Powerful leaders Death penalty: सद्दामपासून शेख हसीनांपर्यंत…; जगातील अनेक शक्तिशाली नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा

Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान
2

Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान

Taiwan Security : भारत-पाक युद्धाचा चीनने घेतला फायदा? अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात ‘मोठा’ स्फोटक दावा
3

Taiwan Security : भारत-पाक युद्धाचा चीनने घेतला फायदा? अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात ‘मोठा’ स्फोटक दावा

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती
4

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.