Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

बांगलादेशातील नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारचा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. खासदार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत, कोणत्याही परिषदेचे नव्हे, अशी भूमिका घेतली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 17, 2026 | 08:27 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार (Photo Credit- X)

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • युनूस यांचा प्रस्ताव अन् तारिक रहमान यांचा नकार!
  • बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच
  • काय आहे नेमकं प्रकरण?
Bangladesh Politics: बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत असतानाच, देशातील राजकीय वातावरण तापले आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने मांडलेला ‘घटनादुरुस्ती परिषदेचा’ (Constitution Reform Council) प्रस्ताव प्रमुख पक्ष असलेल्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (BNP) साफ फेटाळून लावला आहे. यामुळे युनूस यांच्या घटनात्मक बदलांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

नेमका वाद काय?

अंतरिम सरकारने एक विशेष प्रस्ताव मांडला होता, ज्यानुसार सर्व नवनिर्वाचित खासदारांना ‘कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म काउंसिल’चे सदस्य म्हणून एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणे अनिवार्य होते. या परिषदेचा मुख्य उद्देश संसदीय निवडणुकीसोबतच झालेल्या सार्वमताच्या आधारे संविधानात मोठे बदल करणे हा होता. मात्र, शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीलाच BNP ने हा निर्णय ‘मुलतत्ववादी’ आणि ‘मनमानी’ असल्याचे सांगत त्याला विरोध केला.

खासदार हे जनतेचे प्रतिनिधी, परिषदेचे नव्हे: सलाउद्दीन अहमद

BNP चे ज्येष्ठ नेते सलाउद्दीन अहमद यांनी पक्षप्रमुख तारिक रहमान यांच्या उपस्थितीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “पक्षाचे नेते तारिक रहमान यांच्या सूचनेनुसार, आमच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना या सुधारणा परिषदेच्या अर्जावर स्वाक्षरी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जनतेने त्यांना संसदेचे सदस्य म्हणून निवडून दिले आहे, कोणत्याही सुधारणा परिषदेचे सदस्य म्हणून नाही,” असे अहमद यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

BNP च्या मते, ही तथाकथित सुधारणा परिषद विद्यमान संविधानाचा भाग नाही. संविधानातील कोणताही बदल हा संसदीय चर्चा आणि जनमताच्या घटनात्मक प्रक्रियेतूनच व्हायला हवा, असेही पक्षाने ठामपणे मांडले आहे.

शपथविधी सोहळा आणि भारताचे प्रतिनिधित्व

वादाच्या छायेत पार पडलेल्या या सोहळ्यात तारिक रहमान आपल्या पत्नी जुबैदा रहमान आणि मुलगी झाइमा रहमान यांच्यासह उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन यांनी १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या १३ व्या संसदीय निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपस्थिती

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी ढाका येथे पोहोचले आहेत. ओम बिर्ला यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. हा क्षण दोन्ही देशांमधील लोकशाही मूल्ये आणि संबंध अधिक दृढ करणारा ठरेल.”

‘हसीनांना परत पाठवा…’ ; रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा; भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टचं सागितलं

Web Title: Muhammad yunus proposal and tariq rahmans rejection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • Bangladesh
  • International Political news
  • Muhammad Yunus
  • Tariq Rahman

संबंधित बातम्या

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई
1

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
2

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई
3

West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
4

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.