Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Popeye’ क्षेपणास्त्र बनले इस्रायलचे ब्रह्मास्त्र, इराणी रडार उद्ध्वस्त; भारत-इस्रायल कारवायांमध्ये धक्कादायक साम्य

Iran air defenses crushed : इस्रायलने आज पहाटे इराणवर अत्यंत अचूक आणि नियोजित हवाई हल्ला करत १०० हून अधिक लक्ष्यांवर मारा केला. ही कारवाई भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या “ऑपरेशन सिंदूर” ची आठवण करून देणारी ठरली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 13, 2025 | 03:37 PM
After India Israel uses Popeye missile like a Brahmastra crushes Iran's defenses

After India Israel uses Popeye missile like a Brahmastra crushes Iran's defenses

Follow Us
Close
Follow Us:

Iran air defenses crushed : इस्रायलने आज पहाटे इराणवर अत्यंत अचूक आणि नियोजित हवाई हल्ला करत १०० हून अधिक लक्ष्यांवर मारा केला. “ऑपरेशन रायझिंग लायन” या विशेष मोहिमेअंतर्गत इस्रायलने F-35I ‘अदिर’ आणि F-16I ‘सुफा’ लढाऊ विमानांच्या साहाय्याने इराणच्या क्षेपणास्त्र विकास केंद्रांवर, नतान्झ अणुस्थळावर आणि हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला. ही कारवाई भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या “ऑपरेशन सिंदूर” ची आठवण करून देणारी ठरली आहे.

भारताने “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे, लाँच पॅड्स आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ला केला होता. भारताचे Su-30MKI आणि राफेल लढाऊ विमाने पाकिस्तानी हद्दीत घुसून निशाणा साधत होती. त्याचप्रमाणे, इस्रायलनेही इराणमधील लष्करी संरचना, अणुउपक्रम केंद्रे आणि रडार यंत्रणा नष्ट केल्या. दोन्ही देशांच्या कारवायांचे उद्दिष्ट एकच – शत्रूच्या भूमीवर तंतोतंत आणि धडक कारवाई करून त्यांची सामरिक क्षमता खिळखिळी करणे.

‘पोपाय’ क्षेपणास्त्राचा निर्णायक वापर

इस्रायली हवाई दलाने या कारवाईत ‘पोपाय’ हे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र (ASM) वापरले. हे क्षेपणास्त्र इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्री ने विकसित केले असून, याची अचूकता, लांब पल्ल्याची क्षमता आणि जड वॉरहेडमुळे ते अत्यंत प्रभावी मानले जाते. 340 ते 450 किलो स्फोटक क्षमतेसह, हे क्षेपणास्त्र बंकर, रडार, कमांड सेंटर आणि हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहे. विशेष बाब म्हणजे भारतानेही याच ‘पोपाय’ क्षेपणास्त्राचा वापर सुक्कुरमधील पाकिस्तानी हवाई दलाच्या TPS-43J रडार प्रणालीवर केला होता. हे दर्शवते की भारत आणि इस्रायल केवळ शस्त्रास्त्रच नव्हे, तर रणनीतीही सामायिक करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलचा थेट इराणच्या छाताडावर वार; ‘Iranian octopus’चे सैन्य तयार, ‘Gulf countries’ युद्धाच्या छायेत

प्रगत शस्त्रास्त्रांचा वापर – सामरिक साम्य

भारताने जसे ऑपरेशन सिंदूरमध्ये अचूक मार्गदर्शित बॉम्ब वापरले, तसेच इस्रायलनेही GBU-39 SDB, JDAM आणि AIM-120 AMRAAM यांसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. हवाई कारवायेत दोन्ही देशांनी फक्त शक्तीच नव्हे, तर तंत्रज्ञान, गुप्तचर माहिती आणि एआय आधारित लक्ष्यीकरण यांचा वापर करत अत्यंत यशस्वी आक्रमण साधले.

सीमा आणि अंतराचा फरक, पण उद्दिष्ट समान

भारताच्या कारवाईत एक मोठा सामरिक लाभ होता – पाकिस्तान भारताचा शेजारी देश असल्याने लष्करी कारवाई सहज शक्य होती. परंतु इस्रायलसाठी इराणवर थेट हल्ला करणे अधिक गुंतागुंतीचे होते. इराण इस्रायलपासून हजारो किलोमीटर दूर असून, तिथे हल्ला करण्यासाठी इस्रायलने तब्बल २०० लढाऊ विमानांची रणनीतिक तैनाती केली होती.

तथापि, दोन्ही देशांनी आपल्या कारवायांपूर्वी उपग्रह, ISR (Intelligence, Surveillance, Reconnaissance) फीड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लक्ष्य निश्चित केली. भारताच्या कारवायेत गुप्तचर संस्था आणि उपग्रह डेटाचा महत्त्वाचा वाटा होता, तर इस्रायलने मोसाद व अमेरिकन गुप्तचर संस्थांद्वारे लक्ष्य ओळखले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War News Live : इराणचे हालही होणार हिरोशिमा, नागासाकी सारखे? इस्रायलच्या भीषण अणुहल्ल्यानंतर जगभरात चर्चा

नव्या युतीचे संकेत

भारत व इस्रायल यांच्यातील संरक्षण सहकार्य हे यापूर्वीपासूनच मजबूत आहे, पण सध्याच्या कारवायांनी त्यात एक नवे परिमाण दिले आहे. शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण, सामायिक रणनीती, गुप्तचर माहितीचे समन्वयीत वापर आणि तंत्रज्ञानाधारित हल्ले यामुळे हे दोन्ही देश भविष्यातील युद्धनितीचे नवे उदाहरण म्हणून समोर येत आहेत.

भारत आणि इस्रायल या दोघांनीही आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा आणि अचूकतेच्या जोरावर जागतिक स्तरावर स्वतःची लष्करी ताकद सिध्द केली आहे. ‘पोपाय’ क्षेपणास्त्र या दोन्ही देशांसाठी ब्रह्मास्त्र ठरले असून, सामरिक दृष्टिकोनातून ही युती भविष्यातील भूमिकांवर निर्णायक परिणाम घडवू शकते.

Web Title: After india israel uses popeye missile like a brahmastra crushes irans defenses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • international news
  • iran
  • Iran Israel Conflict
  • Israel

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
2

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी;  हजारो जीव धोक्यात
3

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी; हजारो जीव धोक्यात

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
4

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.