Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

AI : NVIDIAने स्वायत्त AI एजंट्सच्या सुरक्षित वापरासाठी OpenShell हे ओपन-सोर्स runtime सादर केले आहे. Sandbox, नेटवर्क नियंत्रण, परवानगी तपासणी आणि policy enforcementच्या माध्यमातून AI एजंट्सना अनियंत्रितपणे काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न या साधनातून केला जातो.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 28, 2026 | 06:44 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • AI एजंट्स साठी स्वतंत्र सॅन्डबॉक्स
  • एजंट्स स्वतःचे नियम बदलू शकणार नाही
  • मानवी नियंत्रण आणि निरीक्षण यावर भर
AI :AI ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स – म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ) च्या शोधामुळे मानवीय जीवनात क्रांती घडत आहे . जगभरातल्या मोठमोठ्या IT कंपन्यां या क्षेत्रात लागेल तेवढा पैसा टाकत आहेत . AI सुद्धा दिवसेंदिवस प्रगती करत आहे . पण या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींनी AI चा धोका सांगायला सुरवात केली आहे . कारण AI एका पॉइंटला गेल्यावर तो मानवी कंट्रोलच्या बाहेर जाऊन त्याला हवे तसे करू शकतो .

जसे भारतात AI वरती काम सुरु नसताना , दक्षिणेत मात्र शंकर या दिग्दर्शकाने रजनीकांत यांना घेऊन रोबोट नावाच्या सिनेमात आधीच भविष्य वर्तवून सांगितले आहे . तसेच बिल गेट्स यांनी सुद्धा AI कोट्यवधी लोकांचा जीव घेऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे . तसेच स्वतः AI कंपन्यांच्या मोठ्या आणि महत्वाच्या पदावर असलेल्या काही व्यक्तींनी कंपनीच्या AI पॉलिसी विरोधात आपल्या नोकऱ्या सोडल्या आहेत .

तर काहींनी तज्ञ मंडळींनी यावर सावधगिरीचे भाष्य करत सूचक इशारे दिले आहेत . याच पृष्ठभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. AI एजंट्स स्वतः निर्णय घेऊन फाइल्स वाचणे, कोड चालवणे, ऑनलाइन साधनांचा वापर करणे आणि विविध कामे पूर्ण करणे अशा क्षमता मिळवत आहेत. त्यामुळे हे एजंट मानवी नियंत्रणाबाहेर जाऊ नयेत, यासाठी NVIDIAने ‘OpenShell’ नावाचे ओपन-सोर्स सुरक्षा साधन विकसित केले आहे.

Breaking News : इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

AI एजंट्स साठी स्वतंत्र सॅन्डबॉक्स

NVIDIA चे OpenShell प्रत्येक AI एजंटला स्वतंत्र आणि नियंत्रित Sandbox Environment मध्ये चालवण्याची व्यवस्था करते . त्यामुळे एजंटला कंप्यूटर मधील प्रत्येक फाईल , नेटवर्क किंवा संवेदनशील माहितीवर थेट प्रवेश मिळत नाही . कोणत्याही संसाधनांचा वापर करायचा , कोणत्या नेटवर्कशी जोडायचे आणि कोणती कृती करायची यावर स्वतंत्र सुरक्षा नियम लागू करता येतात .

एजंट्स स्वतःचे नियम बदलू शकणार नाही

या प्रणालीचे महत्वाचे वैशिष्ठ म्हणजे सुरक्षा धोरणे AI मॉडेलच्या बाहेर Infrastructure Level वर लागू केली जातात . त्यामुळे एजंटने स्वतःच्या सूचना बदलण्याचा किंवा सुरक्षा निर्बंध बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तांत्रिक मर्यादा लागू राहतात . openshell मध्ये प्रत्येक कृतिपूर्वी परवानगी तपासणारी Policy enforcement system आणि gateway देण्यात आला आहे .

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

मानवी नियंत्रण आणि निरीक्षण यावर भर

NVIDIA च्या Secure Agent Workspace डिज़ाइनमध्ये प्रणाली बदलणाऱ्या महत्वाच्या कृतीसाठी मानवी मंजुरी आवश्यक ठेवण्याची तरतूद आहे , नेटवर्क प्रवेश मर्यादित करणे , संवेदनशील एजंट्सपासून दूर ठेवणे आणि प्रत्येक कृतींची नोंद ठेवणे यावरही भर देण्यात आला आहे . कंपनीच्या मते , अशा नियंत्रणामुळे दीर्घकाळ स्वतंत्रपणे काम करणाऱ्या AI एजेंट्सना अधिक सुरक्षित पद्धतीने वापरता येऊ शकते .

Web Title: Ai arbitrary behavior of ai agents to be curbed nvidia introduces a new safety shield

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Cyber security
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
1

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
2

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय
3

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन
4

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.