विमान प्रवाशांना दिलासा! आता विमानतळावर स्वस्तात मिळणार पाणी, चहा, कॉफी!
नवी दिल्ली: भारताला गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्बच्या अनेक धमक्या येते आहेत. या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एअर इंडियाच्या विमानासह सात विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली. सिंगापूरमध्ये ही घटना घडली. त्यांनतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे आपात्कालीन लॅंडिंग करण्यात आले.
दोन लढाऊ विमाने पाठवण्यात आली
सिंगापूर हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांना पाठवून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे लॅंडिंग केले गेले. हे एअर इंडिया एक्सप्रेसचे AXB684 विमान सिंगापूरकडे जात असताना, सिंगापूरच्या हवाई दलाला ईमेलद्वारे बॉम्ब असल्याची सूचना मिळाली. यानंतर तातडीने RSAF F-15SG लढाऊ विमाने उड्डाण करत विमानाला लोकवस्तीपासून दूर नेले आणि काही वेळाने विमान सुरक्षितपणे सिंगापूरच्या चांगी विमानतळावर उतरवण्यात आले.
घटनेची चौकशी सुरू
मीडिया रिपोर्टनुसार, सिंगापूरचे संरक्षण मंत्री एनजी इंग्ज हेन यांनी याबाबत माहिती देत हवाई दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, विमानतळावर उतरल्यानंतर, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान तातडीने विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या घटनेची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर सिंगापूरच्या संरक्षण यंत्रणांनी आपले ग्राउंड बेस्ड एअर डिफेन्स कार्यान्वित केले होते. सिंगापूर हवाई दलाच्या या तात्काळ प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळल्याने संरक्षणमंत्र्यानी त्यांचे कौतुक केले.
कॅनडातही एअर इंडियाचे विमान उतरले
याचदरम्यान, कॅनडामध्ये दुसरी एक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे AI127 विमान सुरक्षा धोक्यामुळे कॅनडातील इक्लुइट विमानतळावर उतरवण्यात आले. याशिवाय, भारतातही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाले असल्याचे दिसून येत आहे. दमणहून लखनऊकडे जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानालाही बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे त्याचे जयपूरमधील विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
सर्व विमानतळांवर कडक सुरक्षा यंत्रणा तैनात
विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या या वाढत्या घटनांमुळे विमान प्रवासावरील सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. सतत वाढत असलेल्या अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणां चिंतेत आहे. प्रत्येक विमानतळावर आणि हवाई दलांवर कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहेत. तसेच संभाव्य धोक्यांवर तात्काळ प्रतिसाद देणे हे आजच्या काळातील आव्हान बनले आहे.