
Air India flight makes emergency landing in Birmingham
काय करावे लागले आपत्कालीन लँडिग?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना एअर इंडियाने, बोईंग विमानाच्या रॅम एअर टर्बाइन (RTA) अचानक सुरु झाले होते. यामुळेच विमानाचे आपत्कलीन लँडिंग करण्यात आले.
एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, लँडिंगनंतर सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक पॅरामिटर्स सामान्य स्थितीत होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे परीक्षण सुरु करण्यात आले आहेत. यामुळे बर्मिंगहॅमहून दिल्लीला परत जाणारी रिटर्न फ्लाइट रद्द करण्यात आली आहे.
विमानाची दोन्ही इंजिन बंद पडल्यास किंवा विमानाच्या इलेक्ट्रिकल किंवा हयड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्यास रॅम एअर टर्बाइन (RTA) सुरु होते. हे टर्बाइन हवेच्या दाबातूव उर्जा निर्माण करते आणि विमानातील आवश्यक प्रणालींना वीज पुरवते. यामुळे विमानावर नियंत्रण मिळवता येते.
हे टर्बाइन अचानक सुरु झाल्याने विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याचेमानले जात आहे. यावेळी अचानक विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. विमानात मोठा गोंधळ उडाला होता. परंतु विमानातील सर्वा पायलट्सने परिस्थिती शांतातेने हाताळली आणि विमान सुरक्षित पणे बर्मिंगहॅममध्ये उतरवले.
विमानातील प्रवाशांसाठी एअर इंडियाने पर्यायी व्यवस्था केले जात असल्याचे सांगितले आहे. परंतु प्रवशांची संख्या आणि इतर तांत्रिक तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. यापूर्वी देखील एअर इंडियाच्या बोईंग विमानात अशाच प्रकारच्या तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही काळात बोईंग विमानाच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा बोईंगच्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आणि विमानांच्या देखभाल प्रक्रियेबाबत प्रश्न उभारले आहेत.
प्रश्न १. एअर इंडियाच्या फ्लाइट AI117 चे आपत्कालीन लँडिग का करण्यात आले?
एअर इंडियाच्या फ्लाइट AI117 चे रॅम एअर टर्बाइन (RTA) अचानक सुरु झाले होते. यामुळेच विमानाचे आपत्कलीन लँडिंग करण्यात आले.
प्रश्न २. एअर इंडियाचे AI117 विमान कोणत्या कंपनीचे होते?
एअर इंडियाचे AI117 फ्लाइट ही बोईंग ७८७ ड्रीमलाइनरची होती.
प्रश्न ३. कुठे करण्यात आले एअर इंडिया फ्लाइट AI117 चे लँडिग?
एअर इंडियाच्या फ्लाइट AI117 चे बर्मिंगहॅममध्ये आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले.
Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण